Shiv sena-BJP Yuti : सोलापूर महापालिकेसाठी युतीचे पहिले पाऊल; शिवसेनेचा एवढ्या जागांवर दावा...भाजपकडून सन्मानाचा शब्द

Solapur Corporation Election : सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात जागावाटपाची पहिली बैठक झाली असून शिवसेनेने सुमारे 42 टक्के जागांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.
Shivsena-BJP Yuti
Shivsena-BJP Yuti Sarkarnama
Published on
Updated on
  1. सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना–भाजप युतीची पहिली अधिकृत बैठक पार पडली.

  2. शिवसेनेने १०२ पैकी ४२ टक्के म्हणजेच सुमारे ४४ जागांची मागणी भाजपकडे केली आहे.

  3. जागा वाटपावर सन्मानजनक तोडगा काढण्याचे भाजपकडून आश्वासन; अंतिम निर्णय २६ डिसेंबरपर्यंत अपेक्षित.

Solapur, 25 December : सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. त्यादृष्टीने पहिली बैठक आज (ता. 25 डिसेंबर) पार पडली. त्यात शिवसेनेने भाजपकडे 42 टक्के म्हणजे सुमारे 44 जागांची मागणी केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. जागा वाटपाबाबत येत्या उद्यापर्यंत (ता. 26 डिसेंबर) निर्णय होईल, असे शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.

सोलापूर (Solapur) महापालिकासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार असून दोन्ही पक्षात आज जागा वाटपाची प्राथमिक बैठक झाली. या बैठकीला भाजपचे निवडणूक प्रभारी तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, तर शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय कदम, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, उत्तमप्रकाश खंदारे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अमर पाटील, प्रवक्त्या ज्योती वाघमारे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री गोरे आणि शहराध्यक्ष तडवळकर यांच्यासोबत शिवसेना (Shivsena) नेत्यांनी निवडणुकीतील जागा वाटपाबाबत चर्चा केली. शिवसेनेकडून आज भाजपला जागांबाबत प्रस्ताव दिला आहे. त्यात त्यांनी महापालिकेच्या १०२ जागांपैकी सुमारे ४२ टक्के (४४ जागा) जागांची मागणी केली आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक सहा आणि सात मधील आठ जागांसह उर्वरीत प्रभागातील प्रत्येकी एक जागा तसेच शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या इतर बारा ठिकाणांचा समावेश करण्यात आलेला आहे.

शिवसेना-भाजपच्या बैठकीत शिवसेनेला सन्मानजनक जागा देण्यात येईल, असे सूतोवाच पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आलेले आहे. त्याबाबतचा निर्णय उद्यापर्यंत होण्याची शक्यता आहे. शिवसेनेने ४४ जागांची मागणी केली असतील तरी त्यांना किती जागा मिळतात, याकडे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Shivsena-BJP Yuti
Uddhav Thackeray : '...हा प्रश्न राज ठाकरेंसाठी नसून उद्धव ठाकरेंसाठी' : प्रकाश आंबेडकरांनी माजी मुख्यमंत्र्यांना कोणता प्रश्न विचारला?

सन्मानजनक तोडग्याचे भाजपचे आश्वासन : संजय कदम

सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून भाजपकडे जागांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आज प्राथमिक बोलणी झालेली आहे. त्यावर सन्मानजनक तोडगा काढण्याचे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आम्हाला दिलेले आहे, असे शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम यांनी सांगितले.

Shivsena-BJP Yuti
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला ठेवले गॅसवर; म्हणाले, ‘...तोपर्यंत आम्ही काँग्रेससोबत बसणार नाही’

प्र.1: शिवसेनेने किती जागांची मागणी केली आहे?
उ: एकूण १०२ पैकी सुमारे ४४ जागांची (४२ टक्के).

प्र.2: बैठकीला कोण कोण उपस्थित होते?
उ: भाजपकडून पालकमंत्री जयकुमार गोरे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर; शिवसेनेकडून संजय कदम, सिद्धाराम म्हेत्रे, अमोल शिंदे आदी.

प्र.3: शिवसेनेच्या मागणीत कोणते प्रभाग महत्त्वाचे आहेत?
उ: प्रभाग क्रमांक ६ व ७ मधील आठ जागा तसेच शिवसेनेचे प्राबल्य असलेले इतर १२ भाग.

प्र.4: अंतिम निर्णय कधी अपेक्षित आहे?
उ: २६ डिसेंबरपर्यंत जागा वाटपावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

प्र.5: शिवसेनेची प्रतिक्रिया काय आहे?
उ: भाजपकडून सन्मानजनक तोडग्याचे आश्वासन मिळाल्याचे संपर्कप्रमुख संजय कदम यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com