
Solapur, 15 August : पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आज (ता. 15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनानिमित्त शायकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर झालेल्या मार्गदर्शनपर भाषणात पालकमंत्री गोरे यांनी हुतात्मा कुर्बान हुसेन यांचे नाव घेतले नाही. त्यावरून सोलापुरात राजकीय गदारोळ उठला आहे. हा संपूर्ण सोलापूरकरांचा अपमान आहे, अशा शब्दांत काँग्रेसने गोरेंवर तोफ डागली आहे, तर ‘एमआयएम’ने चार हुतात्मा पुतळ्याजवळ गोरेंच्या निषेधार्थ आंदोलनाची हाक दिली आहे.
दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी त्यावर तातडीने स्पष्टीकरण दिले आहे. ह्याचा खूप मोठा विषय होणं अपेक्षित नाही. पण, एखाद्या हुतात्म्याचं नाव राहणं, चुकीचं आहे. मी सोलापूरमध्ये नवखा आहे. मला जी नावं माहिती होती, ती मी घेतली. त्याव्यतिरिक्त सर्वच हुतात्म्यांना अभिवादन केले आहे, असे गोरेंनी म्हटले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यसेनानींनी दिलेल्या योगदानाची उल्लेख केल्याशिवाय देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. सोलापूर शहराने सलग चार दिवस स्वतंत्र सोलापूर अशी ओळख मिळवली होती.
सोलापूरच्या स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटीश राजवटीला आव्हान देत स्वराज्याची झलक दाखवली. असे सांगून गोरे यांनी सोलापूर येथील मल्लप्पा धनशेट्टी, शंकर सारडा, जगन्नाथ शिंदे, तसेच अनेक ज्ञात आणि अज्ञात शूर विरांचे योगदान आहे. सोलापूरचा हा इतिहास सर्वांसाठी आजही प्रेरणादायी आहे. गोरे यांनी तीन हुतात्म्यांची नावे घेतली, पण चौथे हुतात्मा कुर्बान हुसने यांचे नाव त्यांनी घेतले नाही, त्यामुळे सोलापूरमध्ये काँग्रेसकडून गोरेंवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी म्हणाले, जगाच्या पाठीवर सोलापूरची ओळख ही चार हुतात्म्यांची शहर अशी आहे. पण आज स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून एका हुतात्म्याचे नाव विसरण्याचे पाप घडले आहे. कुर्बान हुसने असे ते नाव आहे. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी सोलापूर स्वतंत्र झाले होते. त्या चार हुतात्म्यांपैकी एक म्हणजे कुर्बान हुसेन. त्या हुसेन यांचे नाव गोरे विसरतात. हे अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह आहे.
काँग्रेस पक्षानंतर आता एमआयएम पक्षानेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर शहरातील चार हुतात्मा पुतळ्याजवळ गोरे यांचा निषेध करण्यात येत आहे.
बाकी सर्व स्वातंत्र्यसैनिक असं म्हटलं आहे : जयकुमार गोरे
दरम्यान, कुर्बान हुसेन यांचे नाव विसरण्याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, ह्याचा खूप मोठा विषय होणं अपेक्षित नाही. पण, एखाद्या हुतात्म्याचं नाव राहणं, चुकीचं आहे. मी सोलापूरमध्ये नवखा आहे. मला जी नावं माहिती होती, ती सर्व नावं मी घेतली आहेत. ते घेत असताना बाकी सर्व स्वातंत्र्यसैनिक असं म्हटलेले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.