Solapur Politic's : भाजप आमदाराचे सख्खे काका शिवसेनेत प्रवेश करणार?; जयवंतराव, शहाजीबापूंसह शिंदेंच्या निकटवर्तीयाचा पुढाकार

Mangalvedha's Babanrao Autade Will Join Shivsena : मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ आणि तालुक्यातील बहुतांश सहकारी सोसायट्यांवर आवताडे कुटुंबीयांचे प्राबल्य आहे.
Babanrao Autade
Babanrao AutadeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 15 August : सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे. दोन माजी आमदारांच्या पक्षप्रवेशानंतर मंगळवेढा तालुक्यातील सहकार क्षेत्रातील मातब्बर नेते बबनराव आवताडे हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. आवताडे यांच्या शिवसेना प्रवेशासाठी दोन माजी आमदार आणि शिंदेंच्या निकटवर्तीय नेत्याने पुढाकार घेतल्याची माहिती आहे.

बबनराव आतवाडे (Babanrao Autade) हे भारतीय जनता पक्षाचे पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांचे काका आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी उपाध्यक्ष आहेत. आवताडे यांच्या शिवसेना प्रवेशाने सहकार क्षेत्रातील मातब्बर नेता शिंदे गटाला मिळणार आहे.

सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी नुकतीच मंगळवेढ्यात (Mangalvedha) येऊन बबनराव अवताडे यांची भेट घेतली आहे, त्यामुळे आवताडे यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगली आहे. करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आहे. जगताप हे आवताडे यांचे नातेवाईक असून त्यांच्या शिवसेना प्रवेशासाठी शहाजीबापूंबरोबरच जयवंतराव जगताप यांचाही आग्रह आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे हेही आवताडे यांच्या शिवसेना प्रवेशासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. आवताडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास मंगळवेढा तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील मातब्बर नेता शिंदे गटाला मिळणार आहे. त्यांच्या माध्यमातून शिंदे गटाचा सोलापूर जिल्ह्यातील मोठ्या सहकारी संस्थांमध्ये प्रवेश होऊ शकतो.

Babanrao Autade
NCP Politics : शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांचा पुढाकार; अजितदादा, जयंत पाटील अन् रोहित पवार एकत्र येणार?

मंगळवेढा तालुक्यातील बहुतांश सर्व सहकरी संस्थांवर बबनराव आवताडे यांनी आतापर्यंत आपले वर्चस्व राखले आहे. ते भाजपचे आमदार समाधान आवताडे यांचे काका असले तरी त्यांनी आपले राजकीय स्वातंत्र्य कायम राखले आहे. मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ आणि तालुक्यातील बहुतांश सहकारी सोसायट्यांवर आवताडे कुटुंबीयांचे प्राबल्य आहे.

आवताडे यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (दूध पंढरी), लेबर फेडरेशनवर संचालक म्हणून काम केलेले आहे. सोलापूर जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. तसेच, त्यांचे चिरंजीव खरेदी विक्री संघाचे सभापती आहेत. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील सहकार क्षेत्रावर आवताडे कुटुंबांचे मजबूत वर्चस्व आहे.

Babanrao Autade
Chhawa Sanghatna : सूरज चव्हाणांना प्रमोशन देताच ‘छावा’ खवळली; ‘अजितदादांना हे परवडणारे नाही, सुनील तटकरेंचा सत्तेचा माज उतरवू’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बबनराव आवताडे यांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. आवताडे यांच्या माध्यमातून शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यात आणखी एक मजबूत नेता मिळणार आहे, त्यामुळे आवताडेंचा शिवसेना प्रवेश कधी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com