Gore Vs Patil : जयकुमार गोरेंची अभिजीत पाटलांना पुन्हा वॉर्निंग : ‘कोणाच्याही नादी लागा; पण देवाभाऊ अन्‌ माझ्या नादी लागू नका’

Pandharpur Politic's : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादी आमदार अभिजीत पाटील यांच्यात पुन्हा शाब्दिक युद्ध पेटले असून सोलापूरचे राजकारण तापले आहे.
Abhijeet Patil-Jaykumar Gore
Abhijeet Patil-Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 22 January : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजीत पाटील हे पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. दोन्ही महिन्यांपूर्वी माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर ‘आगामी सर्व निवडणुकांत अभिजीत पाटील यांना पाडण्यासाठीच शिंदेंना भाजपत प्रवेश दिला आहे’ असा इशारा दिला होता. त्यानंतर आता ‘बाकी कोणाच्याही नादी लागा, पण देवाभाऊ आणि गोरे यांच्या नादी लागू नका,’ असे ओपन चॅलेंज गोरे यांनी आमदार पाटील यांना दिले आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष समाधान काळे आणि वाखरी जिल्हा परिषद गटातील उमेदवार मोनिका काळे, पटवर्धन कुरोली पंचायत समिती गणाच्या उमेदवार प्रियांका रामकृष्ण नाईकनवरे, गोपाळपूर पंचायत समिती गणाच्या उमेदवार वंदना अण्णासाहेब शिंदे, भाळवणी गटाच्या उमेदवार जयश्री लोखंडे, उत्तम नाईकनवरे, जिगर गायकवाड यांनी गुरुवारी (ता. 22 जानेवारी) भाजपत प्रवेश केला. त्या कार्यक्रमात बोलताना गोरे यांनी पाटील यांना इशारा दिला आहे.

आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी बुधवारी (ता. २१ जानेवारी) भाजप आणि त्यांच्या प्रस्थापित नेत्यांना या निवडणुकीत घरी बसवू, असा इशारा दिला होता. त्यावर पालकमंत्री गोरे यांनी आज पलटवार करत पाटलांना इशारा दिला आहे. गोरे म्हणाले, काहीजण भाजप आणि त्यांच्या नेत्यांना संपविण्याची भाषा करत आहेत. पण, त्यांनी आपल्या क्षमतेनुसार आणि कुवतीनुसार बोलावे. भाजपने छत्र काढले तर आपली काय अवस्था होईल, याचा आधी विचार करावा.

Abhijeet Patil-Jaykumar Gore
Pandharpur Politics : पंढरपुरात राष्ट्रवादीला धक्का; अभिजीत पाटलांनी उमेदवारीस नकार देताच कल्याणराव काळे भाजपत दाखल

सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे म्हणाले, पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ आणि पंचायत समितीच्या 16 जागांवर भाजपचे उमेदवार निवडणून आणण्याचा आम्ही निर्धार केला आहे. काही लोक दोन पक्षांचे मालक होऊ पाहत आहेत. पण, या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल.

Abhijeet Patil-Jaykumar Gore
ZP Election : कार्यकर्ता जपवा अजितदादांनीच...निष्ठावंतासाठी खास गाडी पाठवून दिला एबी फॉर्म...

या वेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, सहकार शिरोमणी कारखान्याचे उपाध्यक्ष भारत कोळेकर, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजित शिंदे आदी उपस्थित होते. (कै.) राजूबापू पाटील यांच्या पत्नी आणि भोसे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार प्रफुल्लता पाटील, सरपंच ॲड. गणेश पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गोरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com