Pandharpur Politics : पंढरपुरात राष्ट्रवादीला धक्का; अभिजीत पाटलांनी उमेदवारीस नकार देताच कल्याणराव काळे भाजपत दाखल

Kalyanrao Kale Politic's : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील राजकारणाला कलाटणी मिळाली असून, कल्याणराव काळे व गणेश पाटील यांची राजकीय कोंडी झाल्याने त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.
Abhijeet patil-kalyanrao kale-Ganesh Patil
Abhijeet patil-kalyanrao kale-Ganesh PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 22 January : सोलापूर जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर पंढरपूर आणि माढ्यातील सर्व सूत्रे आमदार अभिजीत पाटील यांच्याकडे गेली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांच्या समर्थकांना उमेदवारी देण्यास नकार दिला, त्यामुळे काळे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांची कोंडी झाली. पक्षात झालेली कोंडी फोडण्यासाठी अखेर कल्याणराव काळे, त्यांचे बंधू राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे आणि गणेश पाटील यांनी भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय घेत समर्थकांची उमेदवारी निश्चित केली.

समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांना भाजपने वाखरी, तर गणेश पाटील यांच्या मातोश्री प्रफ्फुलता पाटील यांना भोसे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिली आहे. एकीकडे राष्ट्रवादीतील (NCP) नेत्यांनी भाजपतून प्रवेश करून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळविलेली असताना भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पंढरपूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे पहायला मिळाले.

दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) आणि विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांच्यामध्ये युती होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्याबाबत निर्णय अजूनही कळू शकलेला नाही. यामध्ये आमदार पाटील हा जिल्हा परिषदेच्या, तर भालके गट हा पंचायत समितीच्या सर्व जागांवर लढवणार असल्याचा फॉर्म्युला त्यांच्यात झाल्याचे समजते.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर उमेदवार निवडीचे सर्व अधिकार आमदार अभिजीत पाटील यांच्याकडे आले. त्यानंतर पाटील यांनी काळे समर्थकांना उमेदवारी देण्यास नकार दिला, त्यामुळे कल्याणराव काळे, गणेश पाटील, समाधान काळे यांच्यासह समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

पक्ष प्रवेशाचा निर्णय झाल्यानंतर भाजपने काळे गटाच्या उमेदवारांना पक्षाचे एबी फॉर्म दिले. काळे गटाला भाजपने वाखरी, भाळवणी या दोन जिल्हा परिषद गटासह चार पंचायत समिती गण दिल्याची माहिती आहे. भाळवणी गटातून काळे समर्थक जयश्री पोपट लोखंडे यांनी भाजपने उमेदवारी दिली आहे.

Abhijeet patil-kalyanrao kale-Ganesh Patil
Solapur Politic's : जानकरांनी पालकमंत्र्यांचा डाव केला उघड : ‘अभिजीत पाटील, नारायण पाटलांवर गोरेंचा दबाव...आघाडी करून लढा; पण...’

मनसेने टाकळी आणि रोपळे पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाळवणी पंचायत समिती गणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आमदार पाटील व त्यांच्या समर्थकांनीही रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले.

Abhijeet patil-kalyanrao kale-Ganesh Patil
Solapur ZP Election: 'दामाजी'च्या अध्यक्षांची तडकाफडकी मोठी घोषणा; नगरपालिकेप्रमाणेच ZP निवडणुकीच्या आखाड्यातून बाहेर,कारणही सांगितलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com