Mohite Patil : मुख्यमंत्र्यांचे भाष्य अन॒ गोरेंच्या घोषणेमुळे अस्वस्थ मोहिते पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

BJP Political News : नातेपुते येथील दिवाळी स्नेहमिलनात जयकुमार गोरे यांनी राम सातपुते यांना भाजप उमेदवार निवडीचे अधिकार दिल्याची घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाष्यामुळे मोहिते पाटील गटात अस्वस्थता निर्माण झाली.
Ranjitsinh Mohite-Patil-Devendra Fadnavis
Ranjitsinh Mohite-Patil-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on
  1. माळशिरस तालुक्यातील दिवाळी स्नेहमिलन मेळाव्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उमेदवार निवडीचे अधिकार राम सातपुते यांना दिल्याची घोषणा केली, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सातपुते यांच्या नेतृत्वाला समर्थन दर्शवले.

  2. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे मोहिते पाटील गटात अस्वस्थता निर्माण झाली असून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, अर्जुनसिंह व शिवतेजसिंह मोहिते पाटील हे फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मुंबईत गेले आहेत.

  3. माळशिरस तालुक्यात भाजपच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये सातपुते आणि मोहिते पाटील गटात जागावाटप किंवा समझोता होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे; आमदार उत्तम जानकर राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडून त्यांच्या विरोधात मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

Natepute, 27 October : माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील दिवाळी स्नेहमिलन मेळाव्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आगामी निवडणुकीत माळशिरसमध्ये भाजपचे उमेदवार निवडीचे अधिकार हे माजी आमदार राम सातपुते यांनी दिल्याची घोषणा केली. त्या मेळाव्यानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सातपुते यांच्या नेतृत्वाबाबत केलेले भाष्य यामुळे मोहिते पाटील गटात अस्वस्थता निर्माण होणे साहजिक आहे.

त्यातूनच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil), पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जूनसिंह आणि शिवतेजसिंह मोहिते पाटील हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईत गेले आहेत, त्यांना आज (ता. २७ ऑक्टोबर) रात्री उशिरा किंवा उद्या (ता. २८ ऑक्टोबर) सकाळी भेटीची वेळ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

माजी आमदार राम सातपुते (Ram satpute) यांच्या वतीने माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे २५ ऑक्टोबर रोजी दिवाळी स्नेह मिलन मेळावा झाला. त्या मेळाव्यात पालकमंत्री गोरे यांनी माळशिरसमधील उमेदवार निवडीचे अधिकार सातपुते यांना दिल्याचे जाहीर केले. तसेच, त्या मेळाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे आगामी निवडणुकीच्या संदर्भाने राम सातपुते यांच्या नेतृत्वाबाबत भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी (ता. २६ ऑक्टोबर) फलटणच्या दौऱ्यावर होते. सोलापूर जिल्ह्यातील काही नेत्यांनी फलटण गाठून त्या ठिकाणी फडणवीसांची भेट घेतली. त्या ठिकाणी झालेल्या बैठका आणि जाहीर सभेतील मुख्यमंत्र्यांची विधाने यामुळे मोहिते पाटील गट अस्वस्थ झाल्याचे सांगितले जात आहे. त्यातूनच विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील आणि शिवतेजसिंह मोहिते पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाल्याची माहिती आहे.

Ranjitsinh Mohite-Patil-Devendra Fadnavis
Malshiras Politic's : माळशिरसमध्ये भाजप उमेदवार निवडीचे अधिकार राम सातपुतेंना; गोरेंच्या घोषणेमुळे मोहिते पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर असल्यामुळे आज रात्री किंवा उद्या सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मिळण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि अकलूज नगर परिषदेची निवडणूक मोहिते पाटील परिवार भाजपकडून लढवेल, अशी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा अनुभव पाहता व मोहिते पाटलांची राजकीय ताकद पाहता भाजप माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ आणि पंचायत समितीच्या १८ जागांची विभागणी मोहिते पाटील गट आणि माजी आमदार राम सातपुते यांच्यात विभागून दिली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविली जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी दोघांमध्ये समझोता घडविला तर मोहिते पाटील आणि राम सातपुते हे एकत्र भाजपच्या तिकिटावर निवडणुकीला सामोरे जातील आणि त्यांच्या विरोधात आमदार उत्तम जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आखाड्यात उतरतील, अशी चर्चा सुरू आहे.

Ranjitsinh Mohite-Patil-Devendra Fadnavis
Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांच्या टार्गेटवर आता विशाल पाटील; ‘तुमचा जातीयवादाचा किडा वळवळत असेल तर तो ठेचावाच लागेल’

आगामी निवडणुकीत भाजपचे नेतृत्व माजी आमदार राम सातपुते करणार हे अधोरेखित झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मोहिते पाटील गट निवडणुकीत सहभागी होणार का? किंवा भाजपची तिकीटे घेऊन मान्य करणार का, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

1. माळशिरस तालुक्यात उमेदवार निवडीचे अधिकार कोणाकडे आहेत?
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हे अधिकार माजी आमदार राम सातपुते यांना दिले आहेत.

2. मोहिते पाटील गट मुख्यमंत्री फडणवीस यांना का भेटत आहे?
राम सातपुते यांच्या नेतृत्वाबाबत फडणवीस यांनी केलेल्या विधानांमुळे अस्वस्थ झालेला मोहिते पाटील गट स्पष्टीकरण आणि राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी भेट घेणार आहे.

3. भाजपची आगामी रणनिती कशी असू शकते?
मुख्यमंत्री फडणवीस दोन्ही गटांमध्ये समझोता घडवून आणू शकतात, ज्यामुळे मोहिते पाटील आणि सातपुते हे एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com