Gore on sharad Pawar : जयकुमार गोरेंची शरद पवारांवर खोचक टीका; म्हणाले, ‘ इथे अनेक जाणते राजे तयार झाले, पण...’

Pandharpur Palkhi Marg : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी जरी दिल्लीत बसत असले, तरी त्यांनी देशाला जोडण्याचे कामं केलेले आहे. पंतप्रधान मोदींनी गरिबी हटावची केवळ घोषणा केली नाही, तर त्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत.
Sharad Pawar-Jaykumar Gore
Sharad Pawar-Jaykumar Gore Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 14 June : इथे अनेक जाणते राजे तयार झाले. मात्र, त्यांनी कधी विठुरायाकडे येणाऱ्या पालखीसाठी मार्ग बनवला नाही. आजवर अनेक नेते स्वतःला राज्याचे किंवा देशाचे नेते म्हणत होते. मात्र, त्यांनी कधी पालखी मार्ग बनवले नाहीत, अशी टीका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शरद पवारांवर नाव न घेता केली.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालावधीतील विविध विकास कामांचा लेखाजोखा मांडला. त्या वेळी गोरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी जरी दिल्लीत बसत असले, तरी त्यांनी देशाला जोडण्याचे कामं केलेले आहे. पंतप्रधान मोदींनी गरिबी हटावची केवळ घोषणा केली नाही, तर त्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत, असा दावा जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी केला आहे.

पालकमंत्री गोरे म्हणाले, केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये भाजपचे सरकार आले, त्यानंतर पुन्हा 2019 आणि 2024 या निवडणुकीतही लोकांनी भाजपला निवडून दिले. त्यामुळे मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आले आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारला आता ११ वर्षे पूर्ण झाली आहेत.

Sharad Pawar-Jaykumar Gore
Solapur Politic's : जिल्हाध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या बळीराम साठेंकडे नवी जबाबदारी

पालकमंत्री गोरे म्हणाले, केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये भाजपचे सरकार आले, त्यानंतर पुन्हा 2019 आणि 2024 या निवडणुकीतही लोकांनी भाजपला निवडून दिले. त्यामुळे मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आले आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारला आता ११ वर्षे पूर्ण झाली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अकरा वर्षांत संरक्षण, आर्थिक, आरोग्य शिक्षण आणि इतर सर्वच क्षेत्रांत केलेल्या प्रगतीचा आलेख पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मांडला. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्याच्या अगोदर भारताची अर्थव्यवस्था ही फारशी चांगली नव्हती; परंतु मोदी सरकारच्या मागच्या काळात भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचेही गोरे यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी धोरणामुळे शिक्षण, आरोग्य, कृषी अशा अनेक क्षेत्रात प्रगती होत आहे. महाराष्ट्रातील वंचित आणि तळागाळातील घटकाला मोदींनी न्याय दिल्याचेही गोरे यांनी यावेळी सांगण्यात आले.

Sharad Pawar-Jaykumar Gore
Gokul Dairy news : पहिल्याच मासिक बैठकीत अध्यक्षांचा गोकुळच्या ऐशोराम व्यवस्थेला दणका, 'ती' आलिशान गाडी विकणार

ते म्हणाले, महिला सक्षमीकरणाचे धोरण मोदींनी हाती घेतले. महिलांना समाजात मानाचे स्थान मिळाले पाहिजे. देशाच्या विकासाच्या दृष्टीने समाजात असणाऱ्या पन्नास टक्के महिला भगिनींचा विकास झाला, महिला सक्षम झाल्या तरच हा देश सक्षम होईल, अशी भूमिका मोदी यांनी घेतली. त्यातून लखपती दिदीची संकल्पना त्यांनी आणली. बचत गट आणि इतर माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे मोठे काम मोदी सरकारने केले आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com