Gulabrao Patil News: गुलाबराव पाटील म्हणाले, मला महाराष्ट्राचा पाणीवाला बाबा व्हायचंय...

पुसेगाव येथील जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आयोजित जाहीर सभेत मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.
Minister Gulabrao Patil
Minister Gulabrao Patilsarkarnama

Pusegaon News : सुदैवाने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde- Fadanvis Government) मला पुन्हा पाणीपुरवठा खाते भेटल्यानंतर राज्यातील ३८ हजार गावांना पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याची जबाबदारी मी पार पाडली. भविष्यात राज्यातील प्रत्येक गावाला २४ तास शुद्ध पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर करून मला महाराष्ट्राचा पाणीवाला बाबा व्हायचंय, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सांगितले.

पुसेगाव येथील जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी आमदार महेश शिंदे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, पुरषोत्तम जाधव, अधीक्षक अभियंता वैशाली आवटे, पंचायत समितीचे माजी सदस्य मोहनराव जाधव, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीर जाधव, आदी उपस्थित होते.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका आमदारकीपेक्षा कठीण असतात. ‘चून चून के मारेंगे ठाकूर’ अशा पद्धतीचे चित्र ग्रामपंचायत निवडणुकीत असते. असे त्यांनी म्हणताच सभेत एकच हशा पिकला. पाणी प्रश्नावर राजकारण होऊ नये. सर्व योजना मार्गी लागाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Minister Gulabrao Patil
Satara : चार पाच डाकूंकडूनच उद्धव ठाकरेंना चुकीचे फिडींग : गुलाबराव पाटील यांची टीका

महेश शिंदे म्हणाले, ‘‘खटावच्या दुष्काळी भागाचा पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याचा बॅकलॉग शिंदे-फडणवीस सरकारने भरून काढला आहे. जिल्ह्यात यशवंतरावांचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांनी २००८ मध्ये जिहे-कठापूर योजनेचा नारळ फोडला होता. मात्र, प्रत्यक्षात योजना मार्गी न लावता दुष्काळी भागाच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम त्यांनी केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिहे-कठापूर योजनेचे पाणी दुष्काळी भागाला दिले. या योजनेत अधिकची गावे समाविष्ट करून खटावच्या दुष्काळी भागाला दोन टीएमसी पाणी देण्याचा निर्णय सध्याच्या सरकारने घेतला आहे.’’

Minister Gulabrao Patil
Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी पाटणमधून निवडून येऊन दाखवावे : शंभूराज देसाईंचे आव्हान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com