Solapur Drought : पिके नांगरु नका; पंचनाम्याची वाट पाहा : कायद्याने हात बांधलेले, 5 आक्टोंबरपर्यंत दुष्काळ जाहीर करू शकत नाही : पालकमंत्र्यांचे विधान

Jaykumar Gore's statement : पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी परतीच्या मॉन्सूनमुळे 5 ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर करता येणार नसल्याचे सांगितले. पाऊस संपेपर्यंत शेतकऱ्यांनी पिके न नांगरता पंचनाम्याची वाट पाहावी, असे आवाहन केले.
Jaykumar Gore
Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 21 September : आपल्याकडे परतीचा मॉन्सून येतो, त्यामुळे आपल्याला ५ ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर करताच येत नाही. कायदा आणि नियमाने आपले हात बांधलेले आहेत. पाऊस पडण्याचे दिवस संपल्याशिवाय आपल्याला दुष्काळ जाहीर करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पिके न नांगरता पंचनाम्यासाठी वाट पाहिली पाहिजे, असे विधान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.

सोलापुरात आज (ता. 21 सप्टेंबर) पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री गोरे यांनी हे विधान केले आहे.

ते म्हणाले, दुष्काळ जाहीर करण्याचे काही निकष असतात. पाच आक्टोंबर ही केंद्र सरकारची परतीचा मॉन्सून संपण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर दुष्काळी परिस्थिती पाहून निर्णय घेतला जातो. त्यावर सरकार पूर्वतयारी करत आहे. जापेर्यंत पावसाच्या तारखा आहेत, तोपर्यंत आपल्याला पावसाची वाट बघावी लागेल. त्यानंतरच दुष्काळी उपाययोजना करण्यात येतील.

आपल्याकडे परतीचा मॉन्सून येतो, त्यामुळे आपल्याला पाच ऑक्टोबर रोजी दुष्काळ जाहीर करताच येत नाही. कायदा आणि सगळ्या नियमाने आपले हात बांधलेले आहेत. पाऊस पडण्याचे दिवस जेव्हा संपतात, तेव्हाच आपण दुष्काळ जाहीर करतो, असेही त्यांनी नमूद केले.

Jaykumar Gore
Daund Politic's : राहुल कुलांचा राष्ट्रवादीला निवडणुकीआधीच दे धक्का : थेट सभासदांमधून निवडलेल्या मतदार प्रतिनिधींमध्ये बाजी!

कधी कधी एकाच दिवशी प्रचंड पाऊस पडतो, पण सध्या तशी परिस्थिती नाही. आपण सध्या प्रचंड संकटात आहोत. सर्व निकष पूर्ण करून आपले प्रस्ताव वेळेत सरकारकडे पाठविण्यासाठी आजची बैठक होती, असेही ग्रामविकास मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.

Jaykumar Gore
Pune Graduate-Teacher Constituency : ‘पुणे पदवीधर अन्‌ शिक्षक’साठी भाजपनेही ठोकला शड्डू; स्वबळाबाबत जयकुमार गोरेंचे सूचक विधान

शेतकऱ्यांनी पिके नांगरू नयेत

ते म्हणाले, शेतकऱ्यांनी आपली पिके नांगरून न टाकता थांबलं पाहिजे. आपल्याला पंचनामे करेपर्यंत थांबलं पाहिजे. पण, अधिकाऱ्यांनी पिकांची माहिती घेतलेली आहे. काही पिकांना पाऊस पडूनही फायदा होणार नाही. काही पिकांना पाऊस पडला तर पुन्हा उभारी येऊ शकते. थोडीशी पिकं सुस्थितीत आहेत, ती बाहेरही पडू शकतात. कायद्याने सगळ्यांचे हात बांधलेले आहेत. सरकार म्हणून निर्णय जाहीर केला, तर ते तसे होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पिके न नांगरता पंचनाम्यासाठी वाट पाहिली पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com