Eknath Shinde Shivsena: ठाकरेंनी दुखावलेल्या तडफदार नेत्याला राजेश क्षीरसागरांनी हेरलं; मुंबईत फिरलं कोल्हापूरचं राजकारण

Kolhapur Shivsena News : गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सुरू असलेल्या गोंधळानंतर पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचा प्रमुख शिलेदार गेल्याने खळबळ उडाली आहे.
Rajesh kshirsagar harshal surve.jpg
Rajesh kshirsagar harshal surve.jpgSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जिल्हाप्रमुख म्हणून रविकिरण इंगवले यांची निवड करण्यात आल्यानंतर दक्षिण विधानसभा प्रमुख हर्षल सुर्वे त्यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला होता. तर जिल्हाप्रमुख यांच्याविरोधात काम न करण्याची भूमिका घेत त्यांनी परखड मत मांडले होते. मात्र, त्यावर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी ज्यांना जायचं आहे त्यांनी जावे अशा पद्धतीने अहवेलना केल्यानंतर हर्षल सुर्वे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नाराज झालेल्या सुर्वे यांना कात्रजच्या खिंडीत गाठून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष व शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी आपल्यासोबत घेतलं आहे.

युवासेनेचे प्रमुख आणि उद्धव ठाकरे शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया आल्यानंतर व्यतीत झालेल्या हर्षल सुर्वे यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत सुरुवातीला काँग्रेस सोबत जायचे की शिवसेनेसोबत जायचे? यावर कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले. मात्र, रात्री उशिरा त्यांनी आपण शिवसेनेसोबतच राहणार असल्याचा संकेत व्हाट्सअप स्टेटसच्या माध्यमातून दिले.

रविवारच्या दिवशी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि हर्षल सुर्वे यांच्यात चर्चा झाली. चर्चेच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्रीच ते मुंबईला गेले. आज नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आपल्या सोबत घेऊन थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुक्तगिरी बंगला घातला.

हर्षल सुर्वे यांना घेऊन राजेश क्षीरसागर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घडवून दिली. भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्याने शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सुरू असलेल्या गोंधळानंतर पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचा प्रमुख शिलेदार गेल्याने खळबळ उडाली आहे.

Rajesh kshirsagar harshal surve.jpg
Kolhapur Shivsena: कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का; ज्या निवडणुकीत शिवसेना फुटली; 'त्या' नेत्याचा तडफाफडकी राजीनामा

हर्षल सुर्वे यांचा राजीनामा...

कोल्हापूरमध्ये जिल्हाप्रमुख नियुक्तीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सुरु झालेल्या नाराजी नाट्याचा अखेर स्फोट झाला आहे. पक्षाचे दक्षिण विधानसभा प्रमुख हर्षल सुर्वे यांनी पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाचे सचिव विनायक राऊत यांच्याकडे व्हाट्सअॅपद्वारे राजीनामा पाठवला आहे. ते आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

सुर्वे नेमकं काय म्हणाले..?

साहेब माझी जिल्हाप्रमुखपदी निवड झाली नाही. त्यामुळे मनातील खद व्यक्त केली होती. मात्र, आदित्य साहेबांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली तीच जास्त जिव्हारी लागली. आजपर्यंत आदेश मानूनच काम केले होते. कधी आदेश डावलला नाही पण आता आदित्यसाहेबांचा आदेश आला, निर्णय मान्य नसेल तर निघुन जावा. मला निर्णय मान्य नाही साहेब. साहेबांचा आदेश मानून पक्षातून निघून जात आहे. मी माझा पदाचा आणि सक्रिय सभासदचा राजीनामा देत आहे, असे पत्र त्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com