CJP Protest: 'मोदींच्या घरासमोर आंदोलन म्हणजे देशाची बदनामी'; हसन मुश्रीफांचा विरोधकांवर हल्लाबोल

Hasan Mushrif News : कोल्हापुरात अजित पवार जयंतीनिमित्त सेवा सप्ताहाला सुरुवात झाली. मंत्री हसन मुश्रीफ यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत जंतर-मंतर आंदोलनावर विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली.
Hasan Mushriff on Rahul Gandhi's Protest
Hasan Mushriff on Rahul Gandhi's ProtestSarkarnama
Published on
Updated on

Hasan Mushrif: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात आज सेवा सप्ताहाला सुरुवात झाली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या सोहळ्यात मुश्रीफ यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाबाबत विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली.

अजितदादांची जयंती साजरी करावी लागेल असे स्वप्नात देखील वाटले नाही, अशी भावना व्यक्त करत २८ जानेवारी हा राज्यातील जनतेसाठी काळा दिवस ठरला असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. दादांच्या आठवणी मला शब्दात सांगता येणार नाही आणि त्यांच्या आठवणीने मला शब्दही मांडता येणार नाहीत, असे ते म्हणाले.

Hasan Mushriff on Rahul Gandhi's Protest
Kolhapur Politics : अंतर्गत वादामुळे महायुतीला तडे; मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात 'गोकुळ'मध्ये न्याय होता होता 'केडीसी'तही आग धुमसणार

मला मंत्री करण्याचे व शपथ देण्याचं काम दादांनी केले, अशी आठवण त्यांनी यावेळी जागवली. आज त्यांच्या जयंती निमित्ताने सेवा सप्ताह सुरु केला आहे, अशी माहिती मंत्री मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

जंतर-मंतरवरील आंदोलनावर बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, अधिवेशन सुरु असताना अशी घटना झाली असताना विरोधी पक्ष एकत्र येणे स्वाभाविक आहे. आता नीट परीक्षा पुन्हा झाली असून निकाल लागला आहे. पंतप्रधान मोदी यांनीही दोषीला कडक शिक्षा दिली जाईल असे सांगितले आहे. पण विरोधकांना हा मुद्दा सापडला आहे, म्हणजे अंधारात त्यांना दिवा दिसत आहे.

Hasan Mushriff on Rahul Gandhi's Protest
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा दिल्लीत; मोठे संकेत देत मुश्रीफांनी सांगितला रोडमॅप

देशाच्या पंतप्रधान यांच्या घरासमोर परवानगी न घेता आंदोलन करणे हे देशाची बदनामी आहे, असे मत त्यांनी मांडले. विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहात मुद्दे मांडावे, पण त्यांनी मोदी यांच्या घरासमोर जाणे चुकीचे असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com