NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा दिल्लीत; मोठे संकेत देत मुश्रीफांनी सांगितला रोडमॅप

Hasan Mushrif, NCP Merger, Delhi Decision: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय मुंबईत नव्हे तर दिल्लीत होईल, असे हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. कोअर कमिटी बैठकीनंतर आमदार-खासदारांसमोर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Hasan Mushrif: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर विमानतळावर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठे भाष्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर निर्णय मुंबईत नव्हे तर तो दिल्लीत होईल, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. आज ते कोल्हापूर विमानतळ येथे बोलत होते. राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात भाजपने सूचना केल्या आहेत का? याची कल्पना मला नाही. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर सुनील तटकरे आणि सुनेत्रा वहिनींनी आमच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली होती आणि काल पार्थ पवारही मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर या बातम्या सुरू झाल्या आहेत, त्यामुळे याबाबतीत आता चर्चा होणार नाही.

२२ जुलैपासून आम्ही अजितदादांच्या स्मरणार्थ सेवा सप्ताह साजरा करणार आहोत. त्यानंतर २९ जुलैला पार्थ पवार यांचा साखरपुडा आहे. यासंदर्भात आता २९ तारखेनंतरच राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक होईल आणि सर्व आमदार खासदारांच्या समोरच याबाबतीत निर्णय होईल. सोमवारपासून संसदीय अधिवेशनामुळे आमचे तीनही महत्त्वाचे नेते दिल्लीत असतील. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणावर आता मुंबईत नाही तर दिल्लीतच चर्चा होईल. मंत्री पदाबाबत काय ऑफर दिल्या गेल्या आहेत हे प्रसारमाध्यमांमधूनच मला कळतय, असे स्पष्टीकरण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

Hasan Mushrif
Kolhapur Politics : अंतर्गत वादामुळे महायुतीला तडे; मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात 'गोकुळ'मध्ये न्याय होता होता 'केडीसी'तही आग धुमसणार

केंद्र सरकारने कॉकरोच जनता पार्टीच्या दीपके यांना अनेक वेळा आंदोलनासाठी परवानगी दिली आहे. वांगचुक यांनी देखील आंदोलन सुरू केले होते. नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही त्यांची मागणी आहे. मात्र आता नव्याने नीट परीक्षा झाली, त्याचे निकालही लागले आणि आता काही तक्रार राहिलेली नाही. असे असताना एखाद्या मंत्र्यांनी राजीनामाच द्यावा यासाठी असे आंदोलन करणे हे काही बरोबर नाही.

वांगचुक यांची तब्येत बिघडलेली होती. त्यांच्या तब्येतीच्या कारणावरून, औषधोपचार घेत नसतील म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले असावे. ज्यावेळी लोकांना वेठीस धरले जाते, रस्ते अडवणे अशा गोष्टी केल्या जातात तेव्हा न्यायालय स्वतःहून याची दखल घेत असते, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.

Hasan Mushrif
Maharashtra Politics Live Update : विरोधकांवर धडाधड गुन्हे, पण जीवाभावाच्या सहकारी- मित्राच्या संशयास्पद मृत्यूसंदर्भात...: राऊतांचा गंभीर आरोप

जयंत पाटील आणि माझी गेल्या काही दिवसात चर्चा झालेली नाही. इसलामपूरमधील नगराध्यक्ष अपात्रतेबाबत भेट झाल्याचे जयंत पाटील यांनी स्वतः सांगितले आहे. नगराध्यक्ष पद हे लोकनियुक्त असते, कार्यकर्त्यावर अन्याय झाला म्हणून नेता भेटू शकतो. मात्र ते नेमके कशासाठी भेटले आहेत, हे माझ्यापेक्षा त्यांनाच माहिती असेल, असे सांगत प्रफुल्ल पटेल यांच्या नाराजीवर बोलताना आमच्या पक्षात कोणतीही नाराजी नाही, सगळ्या नाराजी दूर होतील, सुनेत्रा वहिनींच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत आणि आमचा पक्ष एकसंध आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com