
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच होती. मात्र या स्पर्धेत शिंदेंच्या शिवसेनेने बाजी मारल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी प्रयत्न करत असताना हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना वाशिमची जबाबदारी देण्यात आली. मुश्रीफ यांनी पहिल्यांदाच कोल्हापुरात प्रतिक्रिया देत आपल्या भावनेला वाट मोकळी करून दिली आहे.
राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंंत्री हसन मुश्रीफ हे सोमवारी (ता.20) कोल्हापूर जिल्हा बँकेत बोलत होते. ते म्हणाले, गेले वीस वर्ष मी मंत्री आहे. यामध्ये केवळ 14 महिने फक्त कोल्हापूरचे पालकमंत्री (Kolhapur Guardian Minister) पद मिळाले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील पालकमंत्री मीच आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
मुश्रीफ म्हणाले, राज्यात पालकमंत्री पदाबाबत ज्या घटना घडत आहेत, त्या बरोबर नाहीत. पालकमंत्री पदाच वाटप झालेलं आहे..मला जो जिल्हा मिळाला आहे. त्या संदर्भात माझ्या भावना मी अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत. आमच्याकडे श्रद्धा आणि सबुरी आहे आणि नेत्यांवर निष्ठा असल्याचंही त्यांनी सांगितले.
महायुतीचं सरकार आहे, अनेक घटना घडत असतात मात्र संयमाने घेऊन काही प्रश्न निकालात काढावे लागतात, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिमचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर दिले आहे.
कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच सहपालकमंत्री पद देण्यात आल्यावरही मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सहपालकमंत्र्यांची नवीन पद्धत आता आलेली आहे. मुंबईला गेल्यानंतर सहपालकमंत्री नेमकं काय आहे, हे नक्की समजून घेईन, असा खोचक टोलाही लगावला.
वड्डेटीवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावर बोलताना, ही मला नवीन बातमी आहे, असं म्हणत स्मित हास्य केलं. या संदर्भात मला माहित नाही. सर्वजण एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रामाणिक आहेत.असं काही होईल वाटत नाही, असेही मुश्रीफ म्हणाले.
संजय राऊत काय म्हणत आहेत, ते काय खरं नाही. तीन पक्ष एकत्र येतात, तेव्हा काही मतमतांतर असू शकतात. मुख्यमंत्री दावोसबद्दल आल्यानंतर सर्व प्रश्न मिटतील. आज मी काही सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकासंदर्भात बोलताना, आम्ही तिने पक्ष एकत्र बसून ठरवू जिथे जिथे एकत्र लढण्याची आवश्यकता आहे. तेथे आम्ही एकत्र लढू , जिथे आवश्यक असेल तिथे मैत्रीपूर्ण लढती ही कर. असेही संकेत त्यांनी यावेळी दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.