Hasan Mushrif : निवडणुकीआधीच मुश्रीफांना पडू लागली उपमुख्यमंत्री पदाची स्वप्न,'म्हणाले...'

Hasan Mushrif News : निवडून आलो तर पुढील वेळी मोठे पद आपल्याला मिळेल. असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूरचे पालकमंत्री आणि कागल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री होण्याबाबत आपली इच्छा व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर गेल्या वीस वर्षांपासून आपण मंत्रिमंडळात काम करत आहोत. त्यामुळे निवडून आलो तर पुढील वेळी मोठे पद आपल्याला मिळेल. असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.

आतापर्यंतच्या राजकारणात मी इतकी गर्दी पाहिली नाही. जवळपास एक लाख लोकं या शक्ती प्रदर्शनाला उपस्थित आहेत. पुन्हा संधी दिली तर मी तुमचा हमाल काम म्हणून करीन. 25 वर्षे मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. तुम मुझे 18 दिन दो मैं तुम्हे दिल दूंगा, असे विधान मंत्री मुश्रीफ यांनी करत मी पुन्हा निवडून आलो तर मुख्यमंत्री नाही पण मी उपमुख्यमंत्री बनू शकतो.

Hasan Mushrif
BJP Candidate List : भाजपची तिसरी यादी जाहीर! 25 उमेदवारांची घोषणा, माळशिरस, आष्टी, नागपूरमधील शिलेदार ठरले

एका एका राज्यात तीन-तीन उपमुख्यमंत्री आहेत. तर आपल्या राज्यात का नाही? इतकं सगळं मला मिळणार असेल तर जो ग्रामपंचायत सदस्य झाला नाही त्याला मतं देऊन मत वाया घालवू नका. आपण गाफील राहू नका, आपण गाफील राहिलो तर घरात जास्त उंदीर फिरत असतात, असा टोला हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी समरजीत घाटगे यांचे नाव न घेता लगावला. कागल विधानसभा मतदारसंघातून आज राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी हसन मुश्रीफ यांनी कागल मधील गैबी चौकात गोमातेचे पूजन करून वसुबारस साजरा केला.

Hasan Mushrif
Swapna Patkar : स्वप्ना पाटकर निवडणुकीच्या रिंगणात; ठाकरेंच्या विश्वासू नेत्याविरोधात लढणार

यावेळी बोलत असताना हसन मुश्रीफ यांनी महायुतीचे सरकार येईल आणि आपण देखील मंत्री होऊ असा आशावाद व्यक्त केला. कागलची निवडणूक जनतेने हातात घेतली आहे, आजची उमेदवारी अर्ज भरण्याची रॅली म्हणजे विजयाची रॅली समजा, विरोधकांचा अति विश्वास म्हणजे पाण्याचे बुडबुडे आहेत, अशी टिप्पणी देखील हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com