Swapna Patkar : स्वप्ना पाटकर निवडणुकीच्या रिंगणात; ठाकरेंच्या विश्वासू नेत्याविरोधात लढणार

Vikhroli Assembly Constituency: कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहेत.
Swapna Patkar
Swapna PatkarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अनेक गंभीर आरोप करणाऱ्या स्वप्ना पाटकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. राऊतांचे धाकटे बंधू सुनील राऊत यांच्याच मतदारसंघातून त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे निवडणुकीत राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सुनील राऊत हे 2014 पासून विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. 2014 आणि 2019 अशी सलग दोनदा त्यांनी निवडणूक जिंकली आहे. मात्र, मागील अडीच-तीन वर्षांत सत्तासमीकरणे बदलल्यानंतर यंदाची निवडणूक होत आहे. तसेच कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत हे काही महिने तुरुंगात होते.

Swapna Patkar
BJP Candidate List : भाजपची तिसरी यादी जाहीर! 25 उमेदवारांची घोषणा, माळशिरस, आष्टी, नागपूरमधील शिलेदार ठरले

याच घोटाळा प्रकरणात स्वप्ना पाटकर साक्षीदार आहेत. त्याआधी त्यांनी संजय राऊत यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. याबाबत त्यांनी पोलिसांतही तक्रार दाखल केली होती. आता निवडणुकीच्या माध्यमातून त्या महाविकास आघाडीचे उमेदवार राऊतांविरोधात उभ्या ठाकणार आहे.

पाटकर यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. लोकशाही मार्गाने लोकशाहीच्या महोत्सवात विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी अर्ज घेत आहे. भ्रष्टाचार, महिला सुरक्षा, शासन-प्रशासनाबाबत रोज सकाळी भोंगे वाजवणारे लोक स्वतः कुपमंडूक वृत्तीचे आहेत. महिलांचा सन्मान आणि त्यांची सुरक्षितता यावर त्यांची अत्यंत गंभीर मते आहेत. मात्र प्रत्यक्षात एका महिलेचे शोषण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे, असे पाटकरांनी म्हटले आहे.

Swapna Patkar
Nagpur MVA : दोन बंडखोर जिचकरांनी वाढवले महाविकास आघाडीचे टेन्शन, काटोल, नागपूर पश्चिममध्ये काय होणार?

भ्रष्टाचारातून मिळणारे लोणी ओरपणाऱ्या लोकांना लोकशाहीच्या मार्गाने धडा शिकवण्याची वेळ आली आहे. मात्र प्रत्यक्षात एका महिलेचे शोषण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यामुळे तो लढा सुरू ठेवतानाच आता विक्रोळी मतदारसंघातून मी जनतेच्या न्यायालयात दाद मागणार आहे. त्यासाठी विधानसभा निवडणुकीत उतरत असल्याचे पाटकर यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

दररोज सकाळी उठून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणारे लोकप्रतिनिधी असूच शकत नाहीत. त्यांचा गोतावळाही तसाच, असे म्हणत त्यांनी संजय राऊतांचे नाव घेता टीका केली आहे. त्यांचा विकृत चेहरा रोज सकाळी उघडा पडतोच. पत्राचाळ, खिचडी कंत्राट यासारख्या आपण केलेल्या भ्रष्टाचारावर भाष्य होऊ नये यासाठी साक्षीदारांना अत्याचाराच्या धमक्या देणाऱ्या घाबरट आणि पळकुट्या लोकांशी आता मी थेट दोन हात करणारच, असे थेट आव्हान पाटकर यांनी दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com