Gokul Election : मंत्री मुश्रीफ प्रत्यक्ष गोकुळच्या मैदानात; 'अदृश्य शक्ती'ला चितपट करण्याचा डाव

Mahayuti Gokul election : राज्यात भाजप हा मोठा भाऊ आहे तर गोकुळ सदस्यांमध्ये राष्ट्रवादी हा मोठा भाऊ आहे. मुख्यमंत्री महोदयांना याबाबत सांगितलं आहे. तिढा लवकरच सुटेल. गोकुळमधील नेमकी वस्तुस्थिती काय? हे देखील सांगितले असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
Gokul Election; Hasan Mushrif
Gokul Election; Hasan Mushrifsarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 12 Sep : वैद्यकीय शिक्षणमंत्री आतापर्यंत गोकुळ दूध संस्थांतील अपात्र झालेल्या संस्थांच्या पाठीमागे राहून त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रक्रियेत त्रास सहन करावा लागल्याने थेट मंत्री मुश्रीफ आता गोकुळच्या मैदानात प्रत्यक्ष उतरले आहेत. कोल्हापुरात झालेला चौदाशे दूध संस्थांचा मेळावा आणि मुंबईत मुख्यमंत्र्यांची घेतलेली मंत्री मुश्रीफ यांनी भेट याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

त्यामुळे सहाजिकच मुख्यमंत्र्यांच्या भेटीत हसन मुश्रीफ यांनी कोणती चर्चा केली असावी हे सध्या गुलदस्त्यात असलं तरी अदृश्य शक्तीला चितपट करण्याचा डाव आखला जात आहे. गोकुळची निवडणूक महायुती मार्फतच लढणार आहोत. हे चित्र लवकरच स्पष्ट होईल. कोण अदृश्य शक्ती हे आम्हालाच माहिती नाही. याबाबत मी माहिती घेईल. यावर चर्चा करून योग्य ते मार्ग काढू. सगळे सदस्य महायुतीचे असताना असं का घडलं हे अनाकलनीय आहे. आम्ही महायुती म्हणून लढणार असून सामंजस्याने मार्ग काढणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

राज्यात भाजप हा मोठा भाऊ आहे तर गोकुळ सदस्यांमध्ये राष्ट्रवादी हा मोठा भाऊ आहे. मुख्यमंत्री महोदयांना याबाबत सांगितलं आहे. तिढा लवकरच सुटेल. गोकुळमधील नेमकी वस्तुस्थिती काय? हे देखील सांगितले असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. दरम्यान मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असली तरी जागावाटपा संदर्भातील प्राथमिक बैठक कोल्हापुरात होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Gokul Election; Hasan Mushrif
PM Narendra Modi : धक्कादायक ! PM नरेंद्र मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांपैकी एकाचे नाशिक कनेक्शन

मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे आमदार समन्वयाने तोडगा काढणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर जागा वाटपाचे अंतिम सूत्र हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडले जाण्याची माहिती समोर येत आहे. नंतर मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार जागावाटप निश्चित करण्यात येणार आहे.

Gokul Election; Hasan Mushrif
Drug Case : शिंदेंच्या नेत्यावर पोलिसांची धडक कारवाई, घरातच सापडले ड्रग्ज; माजी उपसभापतीवर गुन्हा दाखल

मेळाव्यातून भाजपवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न

दोन दिवसांपूर्वी कायदेशीर लढाईत जिंकलेल्या चौदाशे संस्थांच्या प्रतिनिधींचा मेळावा धैर्यप्रसाद मंगल कार्यालय येथे पार पडला. या मेळाव्याला कोणत्याही संचालक किंवा नेत्यांनी उपस्थिती लावली नसली तरी त्यांच्याही मागे बड्या नेत्याचा हात होता. अदृश्य शक्तीला पॅनलमधून वगळा अशी मागणी करत संबंधित नेत्याने एकप्रकारे भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com