PM Narendra Modi : धक्कादायक ! PM नरेंद्र मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांपैकी एकाचे नाशिक कनेक्शन

PM Narendra Modi security breach : बनावट पीएमओ ओळखपत्र प्रकरणाचे नाशिक कनेक्शन समोर आले आहे. मुंबई पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु असून मुंबई पोलिस नाशिकला येण्याची शक्यता आहे.
PM Narendra Modi security breach
PM Narendra Modi security breach Sarkarnama
Published on
Updated on

PM Narendra Modi security breach Nashik connection : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये पंतप्रधान कार्यालयाचे (पीएमओ) ओळखपत्र दाखवून प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणाला नाशिक कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. पीएम मोदींची सुरक्षा व्यवस्था भेदण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांपैकी एकाचे नाशिक कनेक्शन समोर आले आहे.

पंतप्रधानांच्या या दौऱ्या दरम्यान सुरक्षेच्या संदर्भात कठोर तपासणी सुरु होती. त्यावेळी यंत्रणांना दोघांवर संशय आला होता. त्यांनी कार्यक्रमस्थळामध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला. पोलिसांनी अटक केलेल्या या प्रकरणातील संशयित रोहन पारेख याच्यासोबत असलेला खासगी सुरक्षारक्षक दिलीप राजाराम कुंदे नाशिकचा असल्याचे समोर आले आहे. दिलीप राजाराम कुंदे याचा नाशिकच्या लहवीत आणि देवळाली कॅम्प परिसराशी संबंध असल्याचे तपासातून समोर आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून कुंदेच्या नाशिकमधील वास्तव्य, पार्श्वभूमी आणि संपर्कांची माहिती घेतली जाण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बीकेसी परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाच हा प्रकार उघडकीस आला. सुरुवातीला २४ वर्षीय रोहन पारेख याने स्वतःला पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगितले. त्याने पीएमओ अधिकारी असल्याचे दर्शविणारे बनावट ओळखपत्र दाखवून जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत दिलीप कुंदे खासगी सुरक्षारक्षक म्हणून उपस्थित होता.

PM Narendra Modi security breach
PM Narendra Modi : Bookmyshow वर पीएम मोदींचा जलवा! अवघ्या 1 तासात इव्हेंट हाऊसफुल! 42 हजार लोक अजूनही रांगेत

सुरक्षा तपासणीत ओळखपत्र बनावट असल्याचे समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई केली व दोघांना अटक केली. रोहन पारेख सोबत असलेल्या बॉडीगार्डकडे बंदूक आढळून आली होती. शस्त्राचा परवाना वैध असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असले तरी संवेदनशील परिसरात शस्त्र नेण्याची परिस्थिती, त्यासंबंधीचे नियम आणि शस्त्र कोणत्या कारणासाठी बाळगण्यात आले होते, याची चौकशी सुरू आहे.

दिलीप कुंदेचा रोहन पारेखशी संपर्क कसा आला. तसेच त्याचा नाशिकच्या लहवित व देवळाली कॅम्प परिसराशी असलेला संबंध, त्याचे पूर्वीचे वास्तव्य, शस्त्र परवाना कोठून जारी झाला, त्यासंबंधीची कागदपत्रे याची पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे. संशयित दिलीप कुंदे हा माजी लष्करी कर्मचारी असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्याच्याकडून रिव्हॉल्वर जप्त करण्यात आली आहे. दरम्यान न्यायालायाने पारिख व कुंदे या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

PM Narendra Modi security breach
Narendra Modi : सर्वाधिका काळ सत्तेत राहिलेले नेते माहीत आहेत का?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या या मोठ्या प्रश्नामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, या दोघांचा नेमका उद्देश काय होता याचा तपास आता मुंबई पोलिसांकडून सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे पथक नाशिकमध्ये येऊन माहिती घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, नाशिकमधील कोणत्याही व्यक्तीचा या प्रकरणातील सहभाग अद्याप निष्पन्न झालेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com