Hasan Mushrif News : हसन मुश्रीफांनी परदेश सहलीसाठी जनतेकडून मंजूर करून घेतली रजा अन् आभारही मानले!

Hasan Mushrif Foreign Tour : मुश्रीफ यांच्या कागलमधील घराबाहेरच्या फलकावर याबाबतचे जाहीर निवेदन लिहिले गेले आहे.
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama

Kolhapur News : महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या एका कृतीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे, यावर विविध प्रतिक्रियाही उमटत आहेत. हसन मुश्रीफ आणि केडीसीसी बँकेचे सर्व संचालक इटली, स्पेनच्या पंधरा दिवसीय सहलीवर जात आहेत. मात्र तत्पुर्वी त्यांनी आपली रजा जनतेकडूनच मंजूर करून घेतल्याचे समोर आले आहे. शिवाय, परदेश दौऱ्यासाठीच्या या पंधरवड्याच्या रजा मंजुरीबद्दल मुश्रीफ यांनी जनतेचे कृतज्ञतापूर्वक आभारही मानले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, इटली व स्पेनच्या सहलीवर पंधरवड्यासाठी जात असलेल्या मंत्री मुश्रीफ यांनी गेल्या पंधरवड्यापासून प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेकडून पंधरवड्याची रजा मंजूर करून घेतली आहे. 10 मे ते 24 मे या कालावधीत मंत्री मुश्रीफ(Hasan Mushrif) परदेश दौऱ्यावर जात आहे. त्यांच्या कागलमधील घराबाहेरच्या फलकावर याबाबतचे जाहीर निवेदन केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Hasan Mushrif
Kolhapur Politics: विधानसभेच्या इच्छुकांचे महायुतीला टेन्शन; 4 जूनलाच कळणार कोणी कोणाचा केला गेम

या फलकावर लिहिलेले आहे, 'चार जून रोजीच्या मतमोजणीसाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा....! पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यावेळी पंतप्रधान निश्चित होतील, याची खात्री व्यक्त केलेली आहे. दरम्यान; येणारा महिनाभर संपूर्ण देशभरात आचारसंहिता सुरू असल्यामुळे या कालावधीमध्ये मतदारसंघ, जिल्हा, राज्य व मंत्रालयामध्ये व्यक्तिगत व विकासाची कामे होत नाहीत. म्हणून; केडीसीसी बँकेच्या सर्व संचालकांनी स्वखर्चाने इटली व स्पेनचा प्रदेश दौरा आयोजित केला आहे.'

Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama

वैद्यकीय सेवा सुरूच राहील.......! -

तसेच, 10 ते 24 मे या कालावधीमध्ये माझा मोबाईल सुरूच असेल. तिथली वेळ ही भारतीय वेळेच्या साडेतीन तास पुढे आहे. अत्यंत आवश्यक काम असेल तर फोन कराच. या काळात वैद्यकीय सेवा ही निरंतरपणे सुरूच असेल. त्यासाठी सकाळी कागलमधील निवासस्थान आणि मुंबईतील मंत्रालयासमोरील अ - 5 या निवासस्थानी रुग्णसेवेसाठी माणसांची व्यवस्था केलेली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com