NCP Maharashtra : राष्ट्रवादीत वाद, मंत्री हसन मुश्रीफांनी सांगितली इनसाईड स्टोरी, कोण टार्गेट करतंय?

Maharashtra politics News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कुठल्याही भावना व्यक्त केलेल्या नाहीत. फक्त त्यांनी आपल्याला टार्गेट केले गेले असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Hasan mushrif, Sunil tatkare
Hasan mushrif, Sunil tatkare Sarkarnama
Published on
Updated on

Kolahapur News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कुठल्याही भावना व्यक्त केलेल्या नाहीत. फक्त त्यांनी आपल्याला टार्गेट केले गेले असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पक्ष एकसंघ असल्यामुळे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी. यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला. कुटुंबीयांनी पुढाकार घेतला मात्र या कालावधीतच प्रफुल पटेल व सुनील तटकरे या दोघांना टार्गेट करण्यात आल्याची भावना व्यक्त केली असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणीमध्ये होतो. मंगळवारी सुद्धा या संदर्भात बैठक झालेली आहे. या बैठकीत सर्व आमदार सर्व खासदार आणि पक्षाच्या नेतेमंडळी उपस्थित होते. या सर्वांनी सुनेत्रा पवार यांच्या मागे ठामपणे उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Hasan mushrif, Sunil tatkare
Gokul Row: गोकुळचा वाद अखेर महाडिकांच्या जावयांपर्यंत गेलाच! मुश्रीफ गटाकडून नव्या लढाईला सुरुवात

अर्थ खाते हे राष्ट्रवादीचे होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार झाल्या. त्यावेळी बजेट येणार होते. त्यावेळी हे खाते नंतर देतो, असे सांगण्यात आले होते. ते मिळाले नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केली. बुधवारी दिल्लीत सुनेत्रा पवार गेल्या आहेत. याचा निश्चितपणे निर्णय होईल, भाजप हा सन्मान राखेल, असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

Hasan mushrif, Sunil tatkare
Gokul Row: गोकुळचा वाद अखेर महाडिकांच्या जावयांपर्यंत गेलाच! मुश्रीफ गटाकडून नव्या लढाईला सुरुवात

सर्वच पक्ष तयारी करत असतात. ज्या-ज्या वेळी निवडणुका येतात त्या त्यावेळी आपापली तयारी पक्ष करत असतात. भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकत्रच लढतील. सर्व निवडणुकांमध्ये आपापल्या पक्षांनी तयारी करायची असते. कुस्तीच्या आधी पैलवान व्यायाम करतो. तसेच हे प्रकरण असतं पण मला वाटतं युती म्हणूनच ही लढाई होईल, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ बोलत होते.

Hasan mushrif, Sunil tatkare
Gokul Milk Union : गोकुळचे राजकारण मुंबईत धडकले; महायुतीचे नेते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला, प्रशासक टाळण्यासाठी घालणार साकडे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या दिल्ली दौऱ्यावर बोलताना, दोघेही दोन प्रश्नांसाठी ते आज दिल्लीला गेलेले आहेत. त्यामध्ये कांदा आणि साखर हा विषय आहे. कांदा स्वस्त झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठे नुकसान होत आहे. साखरेचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. आपण सामुदायिक आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे, असे काही कारखानदार म्हणत आहेत. अडचणी या क्षेत्रात तयार झालेल्या आहेत. या बैठकीत साखर कारखान्याला सॉफ्ट लोन देणे रेस्ट्रक्चरिंग करणे साखरेचे दर वाढवणे इथेनॉल चा दर वाढवणे. अशा पद्धतीचे मार्ग काढून केंद्र सरकार दिलासा देईल, असे माझे मत आहे, असेही मुश्रीफ म्हणाले.

Hasan mushrif, Sunil tatkare
Gokul Row: गोकुळचा वाद अखेर महाडिकांच्या जावयांपर्यंत गेलाच! मुश्रीफ गटाकडून नव्या लढाईला सुरुवात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com