'ग्लोबल टीचर'लाही सोडलं नाही! मंत्री मुश्रीफांनी शिक्षणाधिकारी लोहारांची थोपटली पाठ

सोलापूरचे शिक्षणाधिकारी डॉ.किरण लोहार यांचा सक्षम अधिकारी म्हणून पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
Ranjitsinh Disale and Kiran Lohar
Ranjitsinh Disale and Kiran Lohar Sarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : कोल्हापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम करत असताना डॉ. किरण लोहार (Kiran Lohar) यांनी उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना सक्षम अधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लोहार हे आता सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या हस्ते झालेल्या सत्कार कार्यक्रमात त्यांनी लोहार यांचे तोंडभरून कौतुक केले.

ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) हे सध्या चर्चेत आले आहेत. त्यांच्यावरील कारवाईमुळे सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी लोहार हेसुद्धा चर्चेत आले आहेत. डिसले यांनी तीन वर्षे कामावर हजर होता पगार घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी लोहार यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. याचबरोबर डिसले यांनी शिक्षण विभागावर केलेल्या गंभीर आरोपांवरूनही त्यांना कारणे दाखवा नोटीस लोहार यांनीच बजावली आहे.

Ranjitsinh Disale and Kiran Lohar
डिसले गुरूजींना नोटीस बजावणारे शिक्षणाधिकारीच आता आले अडचणीत

याच लोहारांचा आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कोल्हापूरमधील व्यंकटेश्वरा प्रकाशनाच्या वतीने लोहार यांना हा सक्षम अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी बोलताना मुश्रीफ यांनी लोहार यांचे कौतुक केले. ग्लोबल टीचरलाही लोहार यांनी सोडले नाही. कायदा सर्वांसाठी समान असतो, हे त्यांनी त्यातून दाखवून दिले, अशी शाबासकीची थाप मुश्रीफ यांनी लोहार यांच्या पाठीवर मारली.

Ranjitsinh Disale and Kiran Lohar
जिल्हा परिषदेचा दणका! डिसले गुरुजींना परत करावा लागणार 35 महिन्यांचा पगार

डॉ . किरण लोहार यांनी कोल्हापूर जिल्हयात माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यरत असताना अनेक उल्लेखनीय कामे केली होती. शिष्यवृत्ती, ऑनलाईन क्लास, शैक्षणिक उठाव, प्रशासनातील झिरो पेंडन्सी, विज्ञान प्रदर्शन यासारख्या कामांची दखल घेऊन व्यंकटेश्‍वरा प्रकाशनाने लोहार यांना सक्षम अधिकारी पुरस्कार दिला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी कोल्हापूर महापालिकेचे स्थायी सभापती आदिल फरास, व्यंकटेश्‍वरा प्रकाशनाचे संयोजक संजय भोसले, कार्यकारी संपादक प्रकाश इनामदार, सचिव प्रविण मोहिते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com