Hasan Mushrif on Abu Azmi : ‘’वारी ही वर्षातून एकदा असते, अन् नमाज...’’ ; मुश्रीफांनी आझमींना सुनावलं!

Hasan Mushrif responds to Abu Azmi remark on Wari -''अबू आझमींना वारकरी आणि वारी याबाबतची माहिती मी समाजावून सांगेन.'', असंही मुश्रीफ म्हणाले आहेत.
Maharashtra Minister Hasan Mushrif addressing the media in response to Abu Azmi's controversial statement about Wari
Maharashtra Minister Hasan Mushrif addressing the media in response to Abu Azmi's controversial statement about Wari sarkarnama
Published on
Updated on

Abu Azmi’s Statement on Wari Sparks Controversy - सध्या महाराष्ट्रात आषाढी वारीमुळे भक्तीमय वातावरण निर्माण झालेलं आहे. राज्यभरातून कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी वारीसोबत विठूनामाचा जयघोषकरत, हाती टाळ आणि मृदगं घेवून आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरीला निघालेले आहेत. वारी मार्गावर वारकऱ्यांचे स्वागत होत आहे, सरकारकडूनही वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होवू नये, यासाठी वारी मार्गावर व्यवस्था केली जात आहे.

दरम्यान, समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी वारकऱ्यांमुळे वाहतुकीची कोंडी होते, असं वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. तर यावरून आता आझमी यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे. शिवाय, राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहेत.

अबू आझमींच्या तोंडून भाजपच हा वाद निर्माण करीत असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

Maharashtra Minister Hasan Mushrif addressing the media in response to Abu Azmi's controversial statement about Wari
Kolhapur Politics - कोल्हापूरातही एकनाथ शिंदेंचं 'मिशन टायगर' सुरूच ; आता भाजप अन् ताराराणी आघाडीचे नगरसेवकही गळाला?

याबाबत मीडियाशी बोलताना मुश्रीफ यांनी म्हटले की, ‘’अबू आझमींना वारकरी संप्रदाय समजलेला नाही. भेटल्यानंतर त्यांना समजावून सांगेन, की वारी ही वर्षातून एकदा असते, नमाज ही दिवसांतून पाचवेळा असते. नमाज ही आपण अशा ठिकाणी पढली पाहीजे की, लोकांना त्रास होता कामा नये.’’

Maharashtra Minister Hasan Mushrif addressing the media in response to Abu Azmi's controversial statement about Wari
Samajwadi Party News : ...अखेर समाजवादी पार्टीने ‘त्या’ तीन आमदारांना दाखवला बाहेरचा रस्ता!

तसेच, ‘’वारी ही वर्षातून एकाच जात असते, त्यातून लाखो लोक जात असतात. त्यासाठी नवीन पालखी मार्ग सरकारने तयार केलेले आहेत. मला वाटतं ते भेटले की मी त्यांना समजावून सांगेन. अबू आझमींना वारकरी आणि वारी याबाबतची माहिती मी समाजावून सांगेन.’’ असंही मुश्रीफ म्हणाले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com