Kolhapur Politics - कोल्हापूरातही एकनाथ शिंदेंचं 'मिशन टायगर' सुरूच ; आता भाजप अन् ताराराणी आघाडीचे नगरसेवकही गळाला?

Kolhapur BJP and Tararani Aaghadi- मंगळवारी पहिल्या टप्प्यातील होणार पक्षप्रवेश, तर दुसऱ्या टप्प्यातील पक्षप्रवेश हा 27 जून रोजी होण्याची शक्यता आहे.
Kolhapur Shivsena
Kolhapur Shivsenasarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Shvisena and Congress - आगामी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत काँग्रेसच्या काही नगरसेवकांचा भरणा होणार आहे. काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्यासोबत काही महत्त्वाचे चेहरे देखील उद्या (मंगळवार, २४ जून) रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

तर टप्प्याटप्प्यात शिवसेनेत या नगरसेवकांचे प्रवेश होणार असल्याने, तर प्राप्त माहितीनुसार दुसऱ्या टप्प्यात भाजप आणि ताराराणी आघाडीमधील देखील माजी नगरसेवकांचा त्यामध्ये समावेश असणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील पक्षप्रवेश हा 27 जून रोजी होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील एक महत्त्वाचा गट फुटला आहे. काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, अश्किन आजगेकर यांच्यासह माजी नगरसेवक असे मिळून जवळपास 16 जण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मंगळवारी मुंबईतील मुक्तगिरी निवासस्थान येथे सायंकाळी पाच वाजता हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहेत. त्यासाठी आज रात्री सर्वजण मुंबईकडे रवाना होणार आहेत. दरम्यान, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जातो.

Kolhapur Shivsena
Kolhapur Constituencies - ..तर कोल्हापूरकरांना ३ खासदार १३ आमदार मिळणार; नव्या मतदारसंघांचे संकेत!

दरम्यान दुसऱ्या टप्प्यात नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि जिल्हा समन्वय सत्यजित उर्फ नाना कदम त्यांच्या पुढकाराने काही नगरसेवक, भाजप आणि ताराराणी आघाडीतील माजी नगरसेवक, पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते आदींचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Kolhapur Shivsena
Mahayuti and Kolhapur Election - स्थानिक निवडणुकांमध्ये जागावाटपच ठरू शकतो महायुतीतील कळीचा मुद्दा, कारण...

कोल्हापूर महानगरपालिकेत भाजपकडे नेतृत्वाचा प्रमुख चेहरा नसल्याने अनेकांचा ओढा शिंदेंच्या शिवसेनेकडे असल्याचे सांगितले जाते. त्यातूनच राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ही पदाधिकाऱ्यांची जबाबदारी उचलल्याचे देखील सांगण्यात येते. मंगळवारी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी खासदार संजय मंडलिक, सत्यजित उर्फ नाना कदम हे देखील मुंबईत उपस्थित राहणार आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com