Gokul Milk : 'गोकुळ'च्या राजकारणात प्रचंड 'धक्कादायक' घडामोडी; हसन मुश्रीफांचे चिरंजीव नवे होणार अध्यक्ष

Navid Mushrif to Take Over as Gokul Dairy Chairman : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ होणार गोकुळ दूध संघाचे नवे अध्यक्ष
Navid Mushrif to Take Over as Gokul Dairy Chairman
Navid Mushrif to Take Over as Gokul Dairy ChairmanSarkarnama
Published on
Updated on

Gokul News : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेला तिढा सुटला आहे. गुरुवारी सायंकाळपासून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या वरिष्ठ नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका पार पडल्या. यानंतर अखेर मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. 30 मे रोजी दुपारी संचालक मंडळाच्या बैठकीत या नावाचा बंद लिफाफा उघडला जाणार आहे.

अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिल्यानंतर गोकुळच्या अध्यक्षपदावर सर्वानुमते शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव अंतिम झाले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत लक्ष घालून अध्यक्ष महायुतीचाच असावा, असा आग्रह धरला. त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी संध्याकाळीच कोल्हापूर गाठले. आमदार सतेज पाटील, विनय कोरे या नेत्यांशी आणि गोकुळच्या सत्ताधारी संचालकांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या.

या बैठकांमध्ये चुयेकर यांचे नाव मागे पडले. त्यानंतर अजित नरके, अमरीशसिंह घाटगे आणि नविद मुश्रीफ या तिघांची नावे चर्चेत आली. पण नरके आणि घाटगे यांच्या नावाला काही नेत्यांचा विरोध झाला. शिवाय घाटगे हे विरोधी पॅनल मधून निवडून आल्याने त्यांची अडचण निर्माण झाली. त्यामुळे नविद मुश्रीफ यांचे नाव शिल्लक राहिले. पण हसन मुश्रीफ हे नविद यांना गोकुळचे अध्यक्ष पद येण्यास सहमत नव्हते.

Navid Mushrif to Take Over as Gokul Dairy Chairman
Kolhapur News: कोल्हापूरकरांसाठी मोठी बातमी; हद्दवाढीचा मार्ग मोकळा..? शिंदेंच्या आमदाराने दिली महत्त्वाची अपडेट

कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष पद, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष पद या दोन मोठ्या सहकारी संस्थेचे अध्यक्षपद एकाच घरात नको अशी भूमिका मंत्री मुश्रीफ यांची होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावानंतर ते मुलाला अध्यक्षपद देण्यास राजी झाल्याची समजते. नविद मुश्रीफ हे गेल्या काही दिवसांपासून परदेश दौऱ्यावर गेले होते. गुरुवारी ते अचानक कोल्हापुरात परतले आहेत. आता आज होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत नविद यांचे नाव जाहीर होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com