
Kolhapur News : कोल्हापूर नगरपालिकेचे रूपांतर कोल्हापूर महानगरपालिकेत 1972 मध्ये रुपांतर झाले. मात्र, त्यानंतर अद्याप एकदाही कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेली नाही. यामुळे शहराचा विकास खुंटल्याचं बोललं जातंय. याचदरम्यान, शहराची हद्दवाढ व्हावी, यासाठी मोठ्या प्रमाणात शहरातून मागणी होत असून सरकार पातळीवरही देखील हद्द वाढीसाठी सकारात्मक असल्याचं दिसून येत असून राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे. तसेच कोल्हापूर हद्दवाढीचा मुद्दा संपल्यातच जमा झाल्याचं माहिती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारानेच दिली आहे.
कोल्हापूर उत्तरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी मंगळवारी (ता.27) शहर हद्दवाढीच्या प्रलंबित प्रश्नावर मोठं भाष्य केलं. ते म्हणाले, कोल्हापूर शहराची तब्बल गेल्या 61 वर्षांपासून हद्दवाढ झालेली नाही, त्यासाठी मी आग्रही आहे. यापूर्वी देखील कॅबिनेटमध्ये हद्दवाढीबाबत निर्णय झाला होता, पण काहींनी विरोध केल्यानंतर तो निर्णय थांबला. सर्वच पक्षनेते आणि अधिकारी यांची बैठक झाली आहे, एका विशिष्ट निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. हद्दवाढबाबत सर्व नेत्यांचे एकमत झालेले आहे, लवकरच याबाबत चांगला निर्णय होईल. असा विश्वास आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर अनेकांचा विश्वास असल्याने शिवसेनेत इन्कमिंग वाढले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत बुकिंग सुरू आहे. लवकरच महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना सज्ज राहील, असेही आमदार क्षीरसागर म्हणाले.
महाराष्ट्र आणि कर्नाटक हा देशाचा भाग आहे. पण अलमट्टीच्या उंचीमुळे महाराष्ट्रातील गावांचे नुकसान होणार असेल तर त्यांनी विचार करावा. डिके शिवकुमार हे जबाबदार मंत्री आहेत, त्यांनी असे वक्तव्य का करावीत? त्यांनी सभ्यपणाने आणि विचार करून असे वक्तव्य करावीत, असेही क्षीरसागर म्हणाले.
आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, काही समाजकंटकाकडून गाद्या आणि पोती टाकून पाणी थांबवण्यात आले आहे. घाणेरडे राजकारण करण्याला देखील मर्यादा हव्या. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ पाच कोटीचा निधी दिला.
पण या गोष्टीला कसा विरोध करायचा यासाठी नाला गाद्या आणि पोती टाकून अडवण्यात आला. आणि वरून चुकीच्या पद्धतीने निधी खर्च होतो म्हणायचं. येत्या काही दिवसात खरी वस्तुस्थिती समोर येईल. अशा समाजकंटकांना योग्य वेळी शिवाजी पेठ उत्तर देईल, या शब्दात विरोधकांचा समाचार घेतला आहे.
मान्सून पूर्व पावसातच कोल्हापुरातील (Kolhapur) गांधी मैदानाची अवस्था बिकट झाल्यानंतर सत्ताधारी आमदारांवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रहार सुरू आहेत. आरोप प्रत्यारोपांचे खेळ सुरू असतानाच राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी थेट विरोधकांनाच इशारा दिला आहे.
काहीबाबतीत किळस येतो. अत्यंत प्रामाणिकपणे गांधी मैदानसाठी मी पाच कोटी मंजूर करून आणले. पण नाल्यात गादी, पोती टाकून पाणी थांबवण्याचे हीन पद्धतीचं राजकारण सुपारी घेऊन करणे याचा मी निषेध करतो. संबंधितांचा शोध घेऊन कोल्हापूर महापालिका आणि पोलीस प्रशासनाला कारवाई करण्याचे, चौकशीचे आदेश दिले आहेत. असा इशारा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.