Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama

अजितदादांपेक्षा त्यांच्या मंत्र्यांनाच मुख्यमंत्री होण्याची घाई; शपथ घेतल्यानंतर काय करणार? हा प्लॅनही सांगितला

Hasan Mushrif On Maharashtra CM : नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस झाला. यावेळी त्याच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पांडूरंगाचे दर्शन घेत पुढच्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शासकीय पूजा करावी, अशी इच्छा व्यक्त केली होती.
Published on

Summary :

  1. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वंदूर येथील कार्यक्रमात "मी मुख्यमंत्री झालो तर..." असे विधान करून खळबळ उडवली आहे.

  2. महायुती सरकारमध्ये आधीपासूनच मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या समर्थकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

  3. मुश्रीफ यांच्या या वक्तव्यानंतर महायुतीतील अंतर्गत नेतृत्व संघर्ष अधिकच उफाळून आला असून विरोधकांनीही टीकेचे तोंड उघडले आहे.

Kolhapur News : राज्यात महायुतीचे सरकार असून सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. पण शिवसेना नेते एकनाथ शिंदे हेच जनतेचा मनातील मुख्यमंत्री असल्याचे त्यांचे शिलेदार म्हणत असतात. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा राष्ट्रवादीतील नेत्यांची आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह आमदार अमोल मिटकरी यांनी तशी इच्छा बोलून दाखवली आहे. मात्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर असल्याचे आता समोर येत आहे. यावेळी त्यांनी मी मुख्यमंत्री झालो तर असे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहे. ते कागल तालुक्यातील वंदूर येथील कार्यक्रमात बोलत होते. (Hasan Mushrif sparks political speculation by expressing desire to become Maharashtra Chief Minister during a speech at Vandoor village program)

मुश्रीफ यांनी, भविष्यात मी कधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवेन. जे कर्ज फेडतील त्या शेतकऱ्यांना दुप्पट अनुदान देईन. यासह आता ज्या शेतकऱ्यांना 50 हजार मिळतात ती रक्कम डबल करेन असे म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची जिल्ह्यासह राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

Ajit Pawar
Kolhapur News: Hasan Mushrif चा मोठा निर्णय, Dhananjay Mahadik कडून धडा घेतला | munna mahadik |

या वेळी त्यांनी, लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात अडथळे येत असल्याचे कबुल केले आहे. यावेळी ते म्हणाले, आमच्या महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. पण सध्या ते होणे जरा अवघड आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागत आहे. त्यातच काही पुरुषांनीही लाडक्या बहीण योजनेच्या पैशांवर डल्ला मारल्याचे आता समोर आले आहे. अशा कारणांमुळे कर्जमाफी करण्यात अडचण होत असल्याचेही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

तसेच त्यांनी, कर्जमाफीबाबत आपलं मत वेगळं असून कर्जमाफी करणार असं जेव्हा सरकार किंवा मंत्री म्हणतात तेंव्हा शेतकरीच कर्ज भरत नाहीत. यामुळे बँका अडचणीत येतात. आता बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे पतसंस्थांचे देखील 38 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांनी थकवल्याची माहिती आहे.

मात्र जे शेतकऱ्यांरी प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांना आपण दुप्पट पैसे दिले पाहिजेत, असे माझे मतं आहे. यामुळे शेतकऱ्यांना पैसे भरायची सवय लागेल. पण कर्जमाफीच्या नावाखाली शेतकरी कर्जच भरणार नसतील तर बँका अडचणीत येऊन त्या बुडतील असाही इशारा हसन मुश्रीफ यांना दिला आहे.

Ajit Pawar
Hasan Mushrif : पिसाळलेल्या कुत्र्याला दगड मारायचा नाही! लक्ष्मण हाकेंचे नाव ऐकताच मुश्रीफ संतापले...

FAQs :

1. हसन मुश्रीफ यांनी काय वक्तव्य केले?
→ त्यांनी वंदूर येथील कार्यक्रमात “मी मुख्यमंत्री झालो तर...” असे विधान केले.

2. सध्या मुख्यमंत्री कोण आहेत?
→ महायुती सरकारमध्ये सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत.

3. अजित पवार यांच्यावर मुख्यमंत्री होण्याचा दबाव का आहे?
→ राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते सुनील तटकरें आणि आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या नावाचा उल्लेख करून ही मागणी मांडली आहे.

4. हसन मुश्रीफ यांच्या विधानामुळे काय परिणाम होऊ शकतो?
→ त्यांच्या विधानामुळे महायुतीतील नेतृत्वावरून नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

5. हे विधान कुठे केले गेले?
→ कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील वंदूर गावातील एका कार्यक्रमात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com