Hasan Mushrif News: मुश्रीफांची 'गोकुळ'च्या राजकारणात सुपर खेळी; राज्य पातळीवरचा हस्तक्षेप टाळण्यासाठी आखला मोठा 'प्लॅन'

Hasan Mushrif Gokul Politics: येत्या 9 सप्टेंबर रोजी गोकुळ दूध संघाची या पंचवार्षिकमधील शेवटची सर्वसाधारण सभा आहे. या सर्वसाधारण सभेतच आगामी महायुतीचं भवितव्य राहणार आहे. एकीकडे मंत्री मुश्रीफ यांनी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांना गोकुळची सभा ही शांततेत सुरू राहण्याबाबत आवाहन केलं आहे.
Hasan Mushrif
Hasan Mushrif Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीत झालेला राज्यस्तरीय राजकीय हस्तक्षेप आणि पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत आपलेच वर्चस्व राहण्यासाठी, शिवाय भाजपकडून सुरू असलेल्या दबाव तंत्रावर मात करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी ठरावांचे गणित मांडून आणि जागांच्या सूत्राचा फॉर्मुला सांगून महायुतीला थेट इशारा दिला आहे.

गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढील वर्षी महायुती म्हणून लढवत असताना या दूध संघात जागा वाटपाच्या सूत्रात अधिक फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे वाटपाच्या फार्मूल्यात मंत्री मुश्रीफ यांनी एका सर्वसाधारण गटातील इच्छुकाकडे जवळपास 125 तर मागासवर्गीय गटातील इच्छुकाकडे 70- 75 ठराव असावेत असे सांगत पहिला डाव टाकला आहे.

पुढील वर्षी गोकुळ (Gokul) दूध संघाची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक महायुती म्हणून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी लढवणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांकडून मंत्री मुश्रीफ यांच्यावर राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडून दबाव टाकण्याचे काम सुरू आहे.

अध्यक्ष निवडीत त्याची प्रचिती आली. मात्र मंत्री वेळ येण्याअगोदरच सावध झाल्याचे चित्र नुकत्याच दिलेल्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. आगामी निवडणुकीत जागा वाटपावेळी होणारा हस्तक्षेप अगोदरच कमी करण्यासाठी त्यांनी गोकुळमधील ठरावांचे गणित आणि जागा वाटपाचे सूत्र सांगून महायुतीतील आपली बाजू भक्कम केली आहे.

Hasan Mushrif
Ajit Pawar: शरद पवार म्हणतात,घटनेत बदल केला तर मराठा आरक्षण शक्य; अजित पवार म्हणाले,'मला जास्त खोलात जायला लावू नका...'

सध्या गोकुळचे ठराव गोळ्या करण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. त्यातूनच मंत्री मुश्रीफ यांनी ठरावाचे गणित मांडून जगाचे सूत्र सांगण्यामागे वेगळेच राजकारण दडल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्ष निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेकडून जास्त जागांची मागणी होऊ शकते.

मात्र, कोणत्याही परिस्थितीत गोकुळ दूध संघावरील आपली पकड कमी होऊ नये यासाठी आतापासूनच राष्ट्रवादीमधील अनेक, गोकुळमध्ये महाराजांची संख्या अधिक असलेले चेहरे आपल्याकडून खेचून घेत आहेत. त्यामुळेच जागा वाटपाचे सूत्र सांगून त्यांनी थेट महायुतीलाच आणि इच्छुकांनाच इशारा दिला आहे.

Hasan Mushrif
Exclusive : "जरांगेंची मागणी संविधानाबाहेरची; ती मान्य करण्यासाठी..." : CM फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!

येत्या 9 सप्टेंबर रोजी गोकुळ दूध संघाची या पंचवार्षिकमधील शेवटची सर्वसाधारण सभा आहे. या सर्वसाधारण सभेतच आगामी महायुतीचं भवितव्य राहणार आहे. एकीकडे मंत्री मुश्रीफ यांनी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांना गोकुळची सभा शांततेत सुरू राहण्यासाठी आवाहन केलं आहे. मात्र, महाडिक यांनी आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देण्याचा इशाराच मंत्री मुश्रीफ यांना दिला आहे.

तर धनंजय महाडिक यांनी देखील मंत्री मुश्रीफ यांना दहीहंडीच्या व्यासपीठावरून इशारा दिला आहे. त्यामुळे महायुती म्हणून लढत असलो तरी, मंत्री मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची मैत्री पाहता महाडिक गटाकडून मुश्रीफ यांच्यावरच अधिक रोख धरला जातोय हे मात्र नक्की आहे. त्यामुळे आगामी व सर्वसाधारण सभेतच याची प्रचिती येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com