Kolhapur News : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल असा दावा काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी केले होते. त्यावर बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी थेट सतेज पाटील यांनाच डिवचले आहे.
एकीकडे सतेज पाटील यांनी मैत्री सांभाळत पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर थेट बोलणे टाळले असले तरी मुश्रीफ यांनी त्यांना थेट लक्ष्य केले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना मुश्रीफ यांनी सतेज पाटलाचा निकालानंतर भ्रमनिरास होईल, मंत्रिपद मिळालं नसल्याचं दुःखं असल्याचा खोचक टोला लगावला आहे.
जागा वाटपावरून बोलताना, महायुतीचे तिन्ही नेते अमित शाह यांच्यासोबत बसलेले आहेत. वाटाघाटी पूर्ण झालेल्या आहेत. जागेचा वाद फारसा राहिला नाही. जे इच्छुक आहेत ते आता कामाला लागले आहेत.
महायुतीमधील तिन्ही पक्षाला सन्मानपूर्वक जागा दिल्या जाणार आहेत. महाराष्ट्र राज्यात पुन्हा महायुतीचा सरकार येईल. महायुतीमध्ये लढतो, त्यावेळी सगळ्यांनी मिळून एकत्र काम करायचे असते. महायुतीमधील तिन्ही पक्षाच्या चिन्हांचा एकत्र काम केलं पाहिजे.
एकमेकांच्या जागा पाडून काम पूर्ण होणार नाही. एकमेकांच्या जागा निवडून आणणे हे गरजेचे आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष जोरदार कामाला लागतील अशी आशा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीची मते आम्हाला जास्त मिळाली नाहीत,असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर फडणवीस कोणत्या आधारे बोलले हे मला माहिती नसल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. पण विधानसभा निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष 57 पैकी 47 जागा पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळतील, असा दावा केला आहे.
गेली 35 ते 40 वर्षे मी शरद पवार (Sharad Pawar) यांचा कार्यकर्ता आहे. शरद पवार यांच्या सगळ्या सुख दुःखात मी सहभागी राहिलो आहे. मी अग्निपरीक्षा दिलेली आहे, मी गुरुदक्षिणा देखील दिलेली आहे. त्यामुळे सुप्रियाताई यांनी हे सगळं समजून घेणे गरजेचे आहे.
हे सगळं करणाऱ्या व्यक्तीला समोर करून असं बोलणं चुकीचं आहे. राजकारणात सावज म्हणजे विरोधक असतात. आता सावज माझ्या टप्प्यात आला आहे, असंही शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.