Nilesh Lanke : 'एकत्र या, सरकार कसे वाकत नाही हे मी पाहतो!' खासदार लंके, असं का म्हणाले?

Primary teachers protest at Ahmednagar Collectorate : अशैक्षणिक कामकाजाविरोधात सरकारकडे मागणी करण्यासाठी काढलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या मोर्चात खासदार नीलेश लंके सहभागी झाले होते.
Nilesh Lanke
Nilesh Lanke Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : प्राथमिक शिक्षकांच्या अशैक्षणिक कामकाजांवरून खासदार नीलेश लंके यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल चढवला.

"अशैक्षणिक कामं करत बसले, तर शिक्षक पोरांना कधी शिकवणार ? शिकवलं नाही, तर पिढी कशी घडणार? आता बस झालं. सरकारनं शिक्षकांच्या मागण्या मान्यच करायला हव्यात. एकत्र या, सरकार कसं वाकत नाही, हेच मी पाहतो", असा इशारा खासदार नीलेश लंके यांनी दिला.

प्राथमिक शिक्षकांनी अशैक्षणिक कामाचा सरकार आणि प्रशासनाकडून पडत असलेल्या बोजावर राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढले होते. अहमदनगरमधील शिक्षकांच्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके सहभागी झाले. खासदार नीलेश लंके यांनी यावेळी महायुती सरकारच्या शैक्षणिक धोरणांवर चांगलाच हल्ला चढवला.

Nilesh Lanke
Ahmednagar Politics : अजितदादांना नगरमधून मोठा धक्का; पवारसाहेबांच्या 'शिवस्वराज्य'ची एन्ट्री अन् मोठ्या नेत्यानं पद सोडलं

नीलेश लंकेंनी मोर्चा सहभागी होताना, मला तुमच्या संघटनांमध्ये राजकारण करायचे नाही. मात्र तुमच्या प्रश्‍नासाठी तुम्ही एकदिलाने एकत्र या. सरकार कसे वाकणार नाही हे आपण पाहू. याच शिक्षकांमुळे राज्यात सरकार सत्तेत आले आहे, याचा विसर पडला आहे. याच शिक्षकांमुळे क्रांती झाली असून त्यांच्यावर आंदोलनाची वेळ येत आहे. शिक्षकांच्या (Teacher) संघटनेत चार गट पडल्याने, त्याचा कोणी राजकीय फायदा घेणार असेल, तर यापुढील काळात आम्ही हे सहन करणार नाही, असा इशारा दिला.

Nilesh Lanke
Rohit Pawar : भाजप आमदार 'कॉपी बहाद्दर'; रोहित पवार म्हणाले, 'त्यांनी 20 लाख रुपये देत...'

'हा जगातला आगळा वेगळा मोर्चा आहे, आम्हाला न्यायदानाचे काम करू द्या, झोपडीतल्या गोरगरीब पोरांना शिकवू द्या, या मागणीसाठी हा मोर्चा आहे. शिक्षकांना या मागणीसाठी मोर्चा काढावा लागतो ही या सरकारसाठी लाजिरवाणी गोष्ट असून महाराष्ट्रात हा काळा दिवस म्हणून पाळला गेला पाहिजे', असा हल्लाबोल खासदार लंके यांनी यावेळी केला.

सरकार आले, तरी मी तुमच्यासोबत...

या मोर्चापुढे मी खासदार म्हणून नव्हे, तर तुमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून उभा आहे. मी शिक्षकाचा मुलगा आहे. शिक्षकांचे दुःख काय, अडचणी काय, आहेत हे मला माहिती आहे. तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी तुमच्यासोबत आहे. वेळ प्रसंगी या प्रश्‍नावर माझे सरकार सत्तेत असले, तरी मी तुमच्यासोबत असेल, अशी ग्वाही खासदार लंके यांनी यावेळी दिली.

...तर मी खासदार म्हणून राहू शकत नाही

मी जर शिक्षकांना न्याय देऊ शकत नसेल, तर माझ्यासारख्या शिक्षकाच्या मुलास खासदार म्हणून राहण्याचा अधिकार नाही. तुम्ही कुठलंही पाऊल उचला, मी तुमच्यासोबत असणार आहे. तुम्हाला कोणी कायद्याचा धाक दाखविण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्याला कायदा दाखविण्याची ताकद नीलेश लंकेमध्ये आहे, असाही इशारा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com