Hatkanangale Lok Sabha 2024 : आघाडीचा 'लपंडाव' तर महायुतीचा 'गनिमी कावा'...; हातकणंगलेत चाललंय तरी काय?

Kolhapur Political News : 'धैर्यशील मानेंना पुन्हा उमेदवारी मिळणार का? की भाजप धक्कातंत्र अवलंबणार...'
Kolhapur Political News :
Kolhapur Political News :Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics : आगामी लोकसभा निवडणुकीला केवळ दोन महिन्यांचा कालावधी उरला असताना महाविकास आघाडी आणि महायुतीत उमेदवारीवरून अजूनही कमालीची गुप्तता आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची भूमिका अजूनही 'वेट अँड वॉच' असे दाखवत असले, तरी जवळपास त्यांचे गुपित ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. महायुतीत मात्र भाजप अन् शिंदे गटात उमेदवारीवरून कमालीची चुरस आहे. काहींनी पुन्हा सर्व्हे सुरु केल्याची माहिती समोर येतं असल्याने उमेदवार कोण असणार? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. (Latest Marathi News)

Kolhapur Political News :
Satara NCP News : जयंत पाटील म्हणाले, पर्याय नाही ; तर परतफेडीचा शशिकांत शिंदेंनी कोणाला दिला इशारा ?

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राज्यात चर्चेचा विषय ठरतो. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शेतकरी नेता असा चेहरा असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी लोकसभेच्या मैदानात असल्याने याकडे राज्याचे लक्ष लागून राहिलेले असते. सध्या शेट्टी यांनी एकला चलो भूमिका घेतली असली, तरी महाविकास आघाडीचा आतल्या गोटातून पाठिंबा असल्याचे बोलले जाते. कारण ज्याप्रमाणे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत चर्चा रंगल्या आहेत. त्या पद्धतीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? असणार याबाबत काडी मात्र चर्चासुद्धा केली जात नाही.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील अंतर्गत गुपित जगजाहीर झाल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे स्वाभिमानी संघटनेच्या भूमिकाला महाविकास आघाडीतील काही कार्यकर्त्यांनी विरोध केला असला, तरी वरिष्ठ पातळीवर त्याची किती दखल घेतली जात आहे, त्या संदर्भात आघाडीमधील लोकप्रतिनिधी त्यावर चर्चा करायला तयार नाही. शिवाय शिवसेनेचा ठाकरे गट ही त्यावर मौन बाळगून आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची भूमिका हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काय असणार, हे वेगळे सांगायला नको.

Kolhapur Political News :
Raju Shetti On Budget: गेल्या दहा वर्षांत सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही

महाविकास आघाडीमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जवळपास चित्र स्पष्ट असताना महायुतीमध्ये अद्यापही उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली आहे. भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांनी दोन पैकी एका जागेवर भाजपचा दावा असल्याचे सांगितल्यानंतर उमेदवारी बदलीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महायुतीतील नेते आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ व राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी दोन्ही जागा सध्या तरी शिंदे गटाकडे राहतील, असे सांगितले असले तरी अंतर्गत मोठ्या घडामोडी घडत आहेत. विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असताना मतदारसंघ भाजपकडे गेल्यास हातकणंगले मधून आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे, हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

भाजपकडून मास्टर प्लॅन केला जावू शकतो?

हातकणंगलेतील महायुतीत ही जागा शिंदे गटाकडे गेल्यास विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी निश्चित मानली जाते. त्यावेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना यांच्यात लढत होऊ शकते. अशावेळी मत विभागणीचा डाव खेळून भाजप या मतदारसंघात मास्टरप्लॅन करू शकते. सध्या आमदार प्रकाश आवाडे हे अपक्ष आहेत. अशावेळी त्यांना किंवा राहुल आवाडे अपक्ष म्हणून रिंगणात उतरून जैन समाजाची मते घेण्याचा डाव भाजप असू शकते, त्याचा फटका स्वाभिमानीला बसू शकतो, असाही अंदाज व्यक्त केला जातो.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com