Lok Sabha Election 2024 : जानकरांचे मिशन परभणी; महाविकास आघाडी अन् महायुतीला टेन्शन

Parbhani Loksabha News : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी जागावाटप होण्यापूर्वीच परभणीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचे जाहीर केले.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Parbhani News: लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्याने राजकीय नेते आणि पक्ष संघटना दावे, घोषणा करत आहेत. महायुतीमधील सहभागी तब्बल सोळा पक्षांपैकी एक महत्वाचा पक्ष असलेला राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी जागावाटप होण्यापूर्वीच परभणीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचे जाहीर केले. जानकरांच्या या घोषणेने महायुती तसेच महाविकास आघाडीचेही टेन्शन वाढले आहे. (Lok Sabha Election 2024)

राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीमधील महत्वाचा घटक पक्ष आहे. महायुतीमधील जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. राज्यात ओबीसी मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. बीड येथील मेळाव्यात महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. एवढंच नाही, तर आपली बूथ स्तरावरील तयारी पूर्ण होत आल्याचेही सांगितले. जानकर यांच्या घोषणेमुळे महायुती अडचणीत आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahadev Jankar
Lok Sabha Election 2024 : ठाकरे गटाची लोकसभेची तयारी; काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये उत्साह दिसेना...

निवडणुकीच्या तयारीत सर्वात पुढे असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून आमदार मेघना बोर्डीकर या प्रमुख दावेदार आहेत. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर हे दुसऱ्या क्रमांकावर होते. अजित पवार यांचे कट्टर समर्थक असल्याने त्यांनी राष्ट्रवादीमधील बंडाळीनंतर अजित पवार यांना साथ दिली. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आग्रही आहे. 

परभणी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजय जाधव हे शिवसेना ठाकरे गटाचे असल्यामुळे महाविकास आघाडीचे तेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे. गेल्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असलेली वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी झाली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा स्वतंत्र उमेदवार असणार नाही. मात्र 'एमआयएम' आणि वंचित बहुजन आघाडीत सहभागी नाही. 

मतदारसंघातील मुस्लीम समाजाचे मतदार मोठ्याप्रमाणावर असल्याने 'एमआयएम' उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत दोन्ही प्रमुख पक्षांचे लक्ष ओबीसी मतदारांवर आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे हे महादेव जानकर यांचे शिलेदार आहेत. आरक्षणाच्या प्रश्नावर ओबीसी मतदार एकवटण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला तर मतदारसंघातील प्रामुख्याने धनगर समाज आणि ओबीसी मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची शक्यता आहे. हे मतदान एकगठ्ठा पडले तर त्याचा फटका महायुती आणि महाविकास आघाडीला बसू शकतो.

त्यामुळे जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून लढण्याची घोषणा केल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी टेन्शनमध्ये आहे. महादेव जानकर यांच्या परभणी मिशनमुळे महायुतीच्या 'मिशन-45'ला धक्का बसू शकतो. तर महाविकास आघाडीच्या हक्काच्या मतांचेही विभाजन होऊ शकते. 

(Edited By-Ganesh Thombare)

Mahadev Jankar
Ajit Pawar Vs Jayant Patil : अजितदादांनी वाढवली जयंत पाटलांची धडधड; थेट 'होमग्राऊंड'वरच सुरु केलं पक्षाचं कार्यालय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com