Dhairyasheel Mane : माझा दर कमी म्हणून 'मटका' लागला; खासदार धैर्यशील मानेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Dhairyasheel Mane On Hatkanangale Constituency Vote counting : "मतमोजणीच्या दिवशी विरोधक दुपारीच म्हणू लागले की, मशाल पेटली पण संध्याकाळी पाच वाजता पाऊस पडला आणि ती मशाल विझल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं."
Dhairyasheel Mane
Dhairyasheel ManeSarkarnama
Published on
Updated on

Sangli News, 18 June : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मानेंच्या एका वक्तव्यामुळे अवैध असणाऱ्या मटक्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मी विजयी होणार असं कोणताही सर्व्हे, पोल दाखवत नव्हते, टीव्हीवर देखील मी मागे असल्याचं सांगितलं जात होतं. पण माझा विजय होणार हे माझे मटका खेळणारे मित्र ठामपणे सांगत होते.

माझा दर मटक्यात सर्वात कमी होता. त्यामुळे मटका कसा लागतो याचे उत्तम उदाहरण मला कळाल्याचं खासदार माने म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. ते सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलत होते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील मानेंचा विजय 13 हजार 426 मतांनी झाला. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील आणि स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांचा पराभव केला आणि धैर्यशील माने सलग दुसऱ्यांदा खासदार बनले. याच आपल्या विजयाचा किस्सा माने यांनी सत्कार सोहळ्यात सांगितला.

Dhairyasheel Mane
Bachchu Kadu : मुख्यमंत्र्यांना शह देण्यासाठी भाजपकडून कुरघोडी? बच्चू कडूंचा मोठा आरोप

धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) म्हणाले, मतमोजणीच्या दिवशी विरोधक दुपारीच म्हणू लागले की, मशाल पेटली, पण संध्याकाळी पाच वाजता पाऊस पडला आणि ती मशाल विझल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. अनेक उमेदवार निवडून येतील असं सांगितलं जात होतं. परंतु मातब्बर उमेदवार पडले. कोणत्याही सर्वेक्षणात, कोणत्याही एक्झिट पोलमध्ये मी ही निवडणूक जिंकेन असं सांगितलं नव्हतं.

मात्र, माझे काही मित्र आहेत, मी त्यांचं नाव सांगणार नाही, ते मला सांगायचे की तुमचा दर खाली आहे, त्यामुळे तुम्ही निवडून येणार. मला ती गोष्ट समजायची नाही, दर खाली म्हणजे नेमकं काय? नंतर समजलं की हे लोक मटका खेळायचे. तुमचा दर खाली म्हणायचे आणि वर सांगायचे तुम्ही निवडून येणार. निवडणुकीच्या निकालानंतर मला कळलं मटका कसा लागतो ते समजलं. या मटका लावणाऱ्यांचं सर्वेक्षण वेगळं असतं.

Dhairyasheel Mane
Video Assembly Legislative Council Election : मोठी बातमी! विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर; फोडाफोडीला उत येणार?

एक्झिट पोलचे सर्वेक्षण आणि यांचे सर्वेक्षण हे खूप वेगवेगळे असतात. हा चेष्टेचा विषय बाजूला सोडला तर ही निवडणूक म्हणजे मटका नव्हती. हा सामान्य माणसाच्या आयुष्याचा निर्णय होता. आपला देश कुणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय होता." असा किस्सा माने यांनी सांगितला.

वादळात दिवा लावला

तसंच यावेळी बोलताना त्यांनी आपण वादळात दिवा लावल्याचंही म्हटलं. ते म्हणाले, "यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील मोठमोठे बुरुज ढासळले, मात्र आपण वादळात दिवा लावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढवली आणि ती यशस्वी करुन दाखवली."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com