

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना थेट सवाल करत, सत्तेत असताना एकही मराठी कॉन्ट्रॅक्टर विकसित केला का, असा प्रश्न उपस्थित केला.
मराठी-अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांनी जोग या मराठी बिल्डरला मोठे कॉन्ट्रॅक्ट दिल्याचे उदाहरण देत तुलना करण्यात आली.
भाजप-आरएसएसवर धर्माच्या नावाखाली खोटा प्रचार करून लोकशाही हुकूमशाहीकडे नेण्याचा आरोप आंबेडकरांनी केला.
Solapur, 25 December : मराठी-अमराठी वादानंतर शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांनी जोग नावाचे बिल्डर शोधून काढला होता. त्यांना अंधेरीचा पूल बांधण्याचे कॉन्ट्रॅट मुंबई कॉर्पोरेशनमधून दिले होते. तुम्ही एक तरी मराठी माणूस कॉन्ट्रॅक्टर म्हणून डेव्हलप केला का? हा प्रश्न राज ठाकरेंसाठी नाही, कारण त्यांच्याकडे सत्ता नव्हती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यावं. स्थानिक मराठी माणसाला एक कॉन्ट्रॅट देऊ शकत नसाल तर कसलं मराठी मराठी करताय..? असा सवाल ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केला.
ॲड प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आज सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यात आंबेडकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मराठी माणसासाठी काय केले, असा सवाल केला आहे.
मनसे-सेना युतीबाबत (MNS-Shivsena Alliance) आंबेडकर म्हणाले, मराठी-अमराठी वाद सुरु झाला, तो इथे सर्व उत्तर प्रदेशाचे व्यक्ती ब्रीज बांधायला येणार का..? असा प्रश्न तेव्हा बाळसाहेब ठाकरे यांना पडलेला, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी जोग नावाचे बिल्डर व्यक्ती शोधून काढली होती. अंधेरीचा सर्वात मोठा फ्लाय ओव्हर जोग यांना बाळासाहेब यांनी बांधायला दिला होता. सुमारे कोट्यवधी रुपयांचे कॉन्ट्रॅट कॉर्पोरेशनमधून दिले होते, तुम्ही एक मराठी माणूस कॉन्ट्रॅक्टर म्हणून डेव्हलप केला का?
हा प्रश्न राज ठाकरेंसाठी नाहीये, कारण त्यांच्याकडे सत्ता नव्हती. उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यावं, स्थानिक मराठी माणसाला एकं कॉन्ट्रॅट देऊ शकत नसाल तर कसलं मराठी मराठी करताय..? उद्धव ठाकरे यांनी सगळे गुजराती आणि युपीवाले भरून ठेवले आहे. स्वतःचं अस्तित्व राहण्यासाठी मनसे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र आले आहेत, असे आंबेडकरांनी म्हटले आहे.
मतदारांचीही नीतीमत्ता ढासळली
नीतिमत्ता ही राजकीय पक्षांसोबत मतदारांचीही ढसाळली आहे. सधन क्लासने जे वाटप होते, ते उचलून फेकून दिले पाहिजे. एक वर्ग वाटप हे दिवाळीच मानतो. मात्र जो सुखी आहे, त्याने तरी या गोष्टी टाळाव्यात, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.
भाजपकडून खोटा प्रचार
जे धर्माला पाहून मतदान देतात ती लोक किंवा त्यांचं कुटुंब धर्मांतर करणार आहात का..? हिंदू धर्मावर संकट आले आहे, हा आरएसएस आणि भाजपचा प्रचार हा खरा आहे की खोटा आहे, याचा विचार करणे गरजेचं आहे. भाजप धर्माच्या नावाखाली लोकशाहीला हुकूमशाहीकडे घेऊन जात आहे. राहुल गांधींसारखा विरोधीपक्ष नेता अमेरिकेतील एपस्टिन्समध्ये पंतप्रधान मोदी यांचे फोटो आहेत का, याचा खुलासासुद्धा विचारात नाहीत.
प्र.1: प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्य आरोप काय केला?
उ: सत्तेत असूनही स्थानिक मराठी माणसाला एकही मोठे कॉन्ट्रॅक्ट दिले नाही, असा आरोप केला.
प्र.2: बाळासाहेब ठाकरे यांचे कोणते उदाहरण आंबेडकरांनी दिले?
उ: अंधेरी फ्लायओव्हरचे कोट्यवधींचे कॉन्ट्रॅक्ट जोग या मराठी बिल्डरला दिल्याचे उदाहरण दिले.
प्र.3: मनसे-सेना (उद्धव ठाकरे) युतीबाबत आंबेडकरांचे मत काय?
उ: स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीच ही युती झाली असल्याचे ते म्हणाले.
प्र.4: भाजपवर आंबेडकरांनी काय टीका केली?
उ: धर्माच्या नावाखाली खोटा प्रचार करून लोकशाहीला हुकूमशाहीकडे नेण्याचा आरोप केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.