Prakash Abitkar : आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापुरातच 'सलमान'ची चर्चा, प्रशासकीय अधिकारीही 'लाभार्थी'

Kolhapur Salman Hair Trainer Case : सध्या कोल्हापुरमध्ये सलमान हेअर ट्रेनर या नावाने एक मुलगा चांगलाच व्हायरल होत आहे. तो अनेकांना तेल लावून केस येतील असा दावा करत आहे.
Prakash Abitkar
Prakash AbitkarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : रोजच्या बदलत्या शैली, खाण्यात झालेल्या बदल आणि पाण्यातील काही घटकांमुळे तरुणांमध्ये केस गळतींचे प्रमाण वाढले आहे. कमी वयातच टक्कल पडल्याने अनेकांमध्ये निराशा आहे. केस येण्यासाठी किंवा केस गळती थांबवण्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न करूनही यश मिळत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. यातून गरिबासह श्रीमंतही सुटलेला नाही.

मात्र कोल्हापुरात सध्या टक्कलवरचे केस पुन्हा येतील असा दावा इन्स्टावरील एका रियलस्टारकडून केला गेला आहे. तर तो लोकांच्या टक्कलवर तेल देखील लावत आहे. पण आता याचे भांडे फुटले असून आरोग्य मंत्र्यांनीच यात लक्ष घालत कारवाईचे आदेश दिले होते. पण काही अधिकारीच सलमानच्या तेलाचे लाभार्थी ठरल्याचे समोर आले आहे. यानंतर आता आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर कोणती भूमिका घेतात? ते काय कारवाई करतात याकडे जिल्ह्यातील लोकांचे लक्ष लागलं आहे.

कोल्हापूर शहरात मागील आठ दिवसांपासून एक तरूण येथील महावीर गार्डनमध्ये केस यावेत यासाठी टक्कलग्रस्तांना आयुर्वेदिक तेल लावत होता. यामुळे येथे प्रचंड गर्दी होत होती. हा सगळा धक्कादायक प्रकार हाकेच्या अंतरावर असणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी सुरू होता.

सलमान हेअर ट्रेनर या नावाने प्रसिद्ध असलेला तथाकथित रीलस्टारने कोल्हापुरातील टक्कल ग्रस्त लोकांना मोफत तेल लावण्याचे काम सुरू केले. मोफत मिळालेल्या औषधाने आणि शेवटचा पर्याय म्हणून अनेकांनी तेल लावण्यासाठी या रीलस्टारकडे गर्दी केली होती. केवळ तरुणच नव्हे तर टक्कल ग्रस्त सरकारी अधिकारी देखील तेल लावून घेण्यासाठी सलमानकडे जात होते. वास्तविक सरकारी अधिकाऱ्यांनी या प्रकाराची साधी चौकशी देखील केली नाही.

Prakash Abitkar
Prakash Abitkar: पहिल्यांदाच मंत्री अन् पालकमंत्रिपद मिळालं, आबिटकर यांच्यासमोर आता 'हे' मोठ आव्हान

सध्या कोल्हापुरात हा चर्चेचा विषय बनला असून मोफत तेल देणाऱ्या या सलमान हेअर ट्रेनर विरोधात महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. खुद्द आरोग्यमंत्र्यांना यात लक्ष घालावे लागले आहे. मोफत औषध देणाऱ्या सलमान जवळ रोज हजारो टकलग्रस्त तेल लावून घेण्यासाठी शहरातील बागेत उपस्थित राहत आहेत.

सलमान instagram द्वारे पीडित लोकांना उपचाराचे ठिकाणी येण्याचे सांगत असल्याने त्या ठिकाणी गर्दी होत आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागाची तारांबळ उडाली आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या प्रकाराचे चौकशीचे आदेश दिल्यानंतर महापालिकेचे अधिकारी कारवाईसाठी गेले. मात्र त्यावेळी देखील या सलमानने अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी ठेवली.

Prakash Abitkar
Prakash Abitkar : HMPV विषाणूचा धोका किती? राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं, म्हणाले, "विषाणू जुनाच आहे पण..."

महापालिकेचे अधिकारी आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी कारवाईसाठी गेले असता सलमान उर्फ मोहम्मद सोहेलने पलायन केले आहे. वास्तविक मनपा कार्यक्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक असते. मात्र परवानगी नाही. दरम्यान या तेलासंदर्भात कागदपत्रे मागितली असता गर्दीचा फायदा घेत सलमानाने धूम ठोकली. इतकेच नव्हे तर सोशल मीडियाद्वारे आता या सलमानने सपोर्ट कोल्हापूर या नावाखाली रिल्स व्हायरल केले आहेत. तर महायुतीत असणाऱ्या एका माजी नगरसेवकाने त्याच्यासाठी बगीच्या ओपन करून दिल्याची चर्चा आहे.

दरम्यान, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या प्रकाराचे चौकशीचे आदेश दिले असून, नागरिकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या, व्यवसायांकडे न जाण्याचं आवाहन केलं आहे. अधिकृत व्यवसायिकांकडेच उपचार घ्यावेत असाच सल्ला देखील त्यांनी नागरिकांना दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com