Prakash Abitkar : HMPV विषाणूचा धोका किती? राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं, म्हणाले, "विषाणू जुनाच आहे पण..."

Prakash Abitkar On HMPV Virus : राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी HMPV विषाणूला घाबरायची गरज नसून तो एक संसर्गजन्य आजार आहे असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवाय या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महाराष्ट्र सरकार लक्ष ठेऊन असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
Prakash Abitkar
Prakash AbitkarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 07 Jan : राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी HMPV विषाणूला घाबरायची गरज नसून तो एक संसर्गजन्य आजार आहे असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवाय या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra) लक्ष ठेऊन असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

एचएमपीव्ही व्हायरसने भारतातील काही राज्यांमध्ये शिरकाव केला आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे दोन महिन्यांच्या बाळाला तर कर्नाटकात 3 महिन्यांच्या मुलीला आणि 8 महिन्यांच्या मुलाला या विषाणुची बाधा झाल्याचं आढळून आलं आहे. अशातच आता महाराष्ट्रातील नागपूर (Nagpur) शहरातही एचएमपीव्ही व्हायरसचे 2 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

याच सर्व पार्श्वभीमीवर बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी राज्यातील जनतेने घाबरण्याची काहीही गरज नसल्याचं, आवाहन नागरिकांना केलं आहे. साम टीव्हीशी बोलताना त्यांनी या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना करत असल्याचं सांगितलं आहे. तर हा विषाणू नवीन नाही, ज्या लोकांमध्ये प्रतिकारशक्ती कमी आहे अशांना या आजाराची लागण होते, असंही त्यांनी सांगितलं आहे.

Prakash Abitkar
Yogi Adityanath : कुंभमेळ्यातून योगी आपले हिंदू जननायकपद ठसवणार?

साम टीव्हीशी बोलातना आरोग्यमंत्री म्हणाले, HMPV विषाणूला घाबरायची गरज नाही. तो एक संसर्गजन्य आजार आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महाराष्ट्र सरकार लक्ष ठेऊन आहे. या विषाणूची ज्यांना लागण झाली आहे, त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. लहान मुले आणि वयस्कर लोकांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना या आजाराची लागण होत आहे.

Prakash Abitkar
HMPV Virus : चीनमध्ये थैमान घालणारा HMPV व्हायरस महाराष्ट्राच्या वेशीवर धडकला, नागपुरात आढळले 2 रुग्ण

मात्र, लोकांनी गाईड लाईन पाळाव्यात आणि सोशल मीडियाद्वारे लोकांमध्ये संभ्रम पसरवू नये, असं आवाहन त्यांनी केलं. तसंच, कोविडमध्ये बरंच शिकायला मिळालं. तो विषाणू नवा होता पण त्यावेळी सुविधांचा मोठा अभाव होता. मात्र, आता सुविधा आहेत, औषधे आहेत. कोरोना काळात घाबरून आपण खूप नुकसान केलं त्यामुळे आता घाबरण्याची गरज नसल्याचं आबिटकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com