Bhalke Group Meeting : प्रणिती शिंदेंना मदत करू; पण विधानसभेचा शब्द घ्या : भगीरथ भालकेंवर समर्थकांचा दबाव

Solapur Lok Sabha Constituency : सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात लढत होत आहे. त्यात पाठिंबा मिळविण्यासाठी दोन्ही बाजूकडून जोरदार प्रयत्न होताना दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भालके गटाची मंगळवेढ्यात बैठक झाली. त्यात आगामी विधानसभेसाठी शब्द घेण्याची आग्रही भूमिका भालके समर्थकांनी मांडली.
Bhalke Group Meeting
Bhalke Group MeetingSarkarnama

Mangalvedha, 08 April : लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांना निश्चितपणे मदत करू. मात्र, आगामी विधानसभेचा काँग्रेस नेतृत्वाकडून शब्द घ्यावा, असा आग्रह मंगळेवढ्यातील भालके समर्थकांनी भगीरथ भालके यांच्यापुढे धरला. शेवटी निर्णय घेण्याचा अधिकार भालकेंना देण्यात आला. त्याबाबत येत्या दोन दिवसांत कोणती भूमिका घ्यायची, याचा निर्णय घेण्यात येईल, असे भालके यांनी स्पष्ट केले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok Sabha Constituency) काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात लढत होत आहे. त्यात पाठिंबा मिळविण्यासाठी दोन्ही बाजूकडून जोरदार प्रयत्न होताना दिसत आहेत. भाजप आणि काँग्रेसकडून प्रचाराला जोर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर भालके गटाची मंगळवेढ्यात बैठक झाली. त्यात आगामी विधानसभेसाठी शब्द घेण्याची आग्रही भूमिका भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) समर्थकांनी मांडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bhalke Group Meeting
Lok Sabha Election 2024 : ‘आयाराम गयारामां’ना भाजपमध्ये सुगीचे दिवस!

भालके गटाच्या कार्यकर्त्यांनी आपली मते उघडपणे आणि मोकळपणाने मांडली. मोदी लाट असतानाही गेल्या लोकसभा निवडणुकीत (स्व.) आमदार भारत भालके यांच्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांना पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले होते. मात्र, त्या बदल्यात काँग्रेसने भालके गटाला काय दिले, असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

सरकारविरोधी वातावरण असल्यामुळे प्रणिती शिंदे यांना मदत करण्यात येईल. मात्र, भविष्यातील राजकारणाबद्दल त्यांच्याकडून शब्द घ्यावा, असा आग्रह ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केला. भारत भालके हे जनता हीच माझा पक्ष मानायचे, जनता जे सांगेल तेच भारत भालके ऐकायचे. भालकेंनी घेतलेली निर्णय जनताही मान्य करायची. त्यामुळे भगीरथ भालके यांनीही भारतनाना प्रमाणेच निर्णय घ्यावा. आम्ही तुमच्या सोबत आहे, तुम्ही थांबा म्हटलं तरी आम्ही घरी शांत बसतो, असंही मत काही कार्यकर्त्यांनी मांडले. लोकसभा निवडणुकीत भालके गटाची भूमिका मंगळवेढ्यात महत्त्वाची ठरू शकते.

Bhalke Group Meeting
Solapur BJP : 'सोलापूर, माढ्यात भाजपविरोधात वातावरण'; अजित पवार गटाच्या नेत्यानेच पेटवली वात

दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार : भगीरथ भालके

मंगळेवढ्यातील भालके गटाच्या कार्यकर्त्यांनी मेळाव्यात आपली भूमिका मांडली आहे. निर्णय घेण्याचा अधिकार मला दिला आहे. पण, काही गावचे प्रतिनिध आणि पदधिकारी अनुपस्थित होते, त्यामुळे उर्वरीत लोकांशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत भालके गटाची भूमिका जाही करण्यात येईल, असे भगीरथ भालके यांनी स्पष्ट केले.

Edited By : Vijay Dudhale

Bhalke Group Meeting
Karmala News : भाजपत जाऊनही बागलांच्या अडचणी संपेनात; दिग्विजय बागलांसह 18 संचालकांवर गुन्हा नोंदविण्याचे आदेश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com