Karmala News : भाजपत जाऊनही बागलांच्या अडचणी संपेनात; दिग्विजय बागलांसह 18 संचालकांवर गुन्हा नोंदविण्याचे आदेश

Bagal Group News : करमाळा तालुक्यातील आळजापूर येथील शेतकरी समाधान सदाशिव रणसिंग यांनी उसाचे बिल मिळावे, यासाठी करमाळा न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर मकाई कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल आणि 17 संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
Digvijay Bagal
Digvijay BagalSarkarnama
Published on
Updated on

Karmala, 08 April : केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतरही करमाळ्यातील बागल यांच्या अडचणी काही केल्या संपण्याचे नाव घेत नाहीत. मागील हंगामात गाळप झालेल्या उसाचे बिल गेली वर्षभरानंतरही न दिल्याने कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष दिग्विजय बागल आणि 17 संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, असा आदेश करमाळा न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत बागलांच्या अडचणी वाढल्या आहेत.

या प्रकरणी करमाळा तालुक्यातील आळजापूर येथील शेतकरी समाधान सदाशिव रणसिंग यांनी उसाचे बिल मिळावे, यासाठी करमाळा न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर मकाई कारखान्याचे (Makai sugar factory ) अध्यक्ष दिग्विजय बागल आणि 17 संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Digvijay Bagal
Madha Lok Sabha 2024 : भाजप कार्यकर्त्याने फडणवीसांना रक्ताने लिहिले पत्र; माढ्याच्या उमेदवारीबाबत केली मोठी मागणी

कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष दिग्विजय बागल ( Digvijay Bagal), संचालक उत्तम पांढरे, महादेव गुंजाळ, नंदकिशोर भोसले, गोकुळ नलवडे, बाळासाहेब सरडे, महादेव सरडे, सुनील शिंदे, रामचंद्र हाके, धर्मराज नाळे, नितीन राख, रंजना कदम, उमा फरतडे, राणी लोखंडे, संतोष पाटील, दत्तात्रय गायकवाड, प्रभारी कार्यकारी संचालक हरिचंद्र खाटमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश करमाळा न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याने गाळप केलेल्या उसाचे बिल द्यावे, यासाठी विविध पातळ्यांवर गेली वर्षभरापासून आंदोलने सुरू होती. आंदोलन केल्यानंतरही पैसे मिळत नसल्याने काही शेतकरी हे कोर्टात गेले होते. कारखान्याने गाळप केलेल्या उसाचे बिल न देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी न्यायालयात केली होती.

Digvijay Bagal
Solapur Lok Sabha 2024 : प्रणिती शिंदेंना पाठिंबा जाहीर करताना आडम मास्तरांचा ‘शहर मध्य’बाबत मोठा दावा...

वास्तविक उसाचे गाळप झाल्यानंतर 14 दिवसांच्या आत संबंधित शेतकऱ्याला एफआरपीनुसार पैसे देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाचे बिल अद्याप मिळालेले नाही. उलट कारखान्याने 2022-23 या हंगामात उत्पादित केलेली साखर, मॉलेसिस, बगॅस व इतर उत्पादने विक्री केली आहेत. त्या रकमेतून शेतकऱ्यांची बिले देण्याऐवजी ते पैसे इतरत्र वापरण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल आणि मकाई साखर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष दिग्विजय बागल यांंनी काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्यामुळे बागल गटाला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. सत्ताधारी भाजपकडून साखर कारखान्याला पैसे मिळतील आणि त्यातून शेतकऱ्यांना पैसे मिळतील, अशी अपेक्षा असताना उलट बागल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये जाऊनही बागलांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत.

R

Digvijay Bagal
Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापुरात मुश्रीफांना मोठा झटका; निष्ठावंताचा मंडलिकांच्या प्रचारास नकार, काँग्रेससोबत राहणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com