Gopichand Padalkar : जयंतराव; समोरासमोर येऊन वार करा,कशाला कुणाला पुढं करता; गोपीचंद पडळकरांनी पुन्हा ललकारले

Land Scam Allegations : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी औंध देवस्थानाची तब्बल 34 एकर जमीन हडप केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी दोन दिवसांपूर्वी केला आहे.
Jayant Patil-Gopichand Padlkar
Jayant Patil-Gopichand PadlkarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 21 March : ‘जयंत पाटील जरा बावचाळलेले आहेत, त्यांना काही सुचनासं झालं आहे. त्यांना वाटतंय मी थांबेल. पण, मी थांबत नसतो. जयंतरावांना मी कालच सांगितलं आहे की, जयंतराव समोरासमोर वार करा. मी तुम्हाला बोलतो. तुम्हीच पुढं येऊन बोला ना. कशा कुणाला एखाद्या छोट्या कार्यकर्त्याला पुढं करता, असे चॅलेंज आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना केले.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी औंध देवस्थानाची तब्बल 34 एकर जमीन हडप केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी दोन दिवसांपूर्वी केला आहे. ही जमीन हडप करताना तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार सुरेश धस यांनी पडळकर यांना मदत केल्याचा दावाही खाडे यांनी केला आहे. त्याबाबत स्पष्टीकरण देताना पडळकर यांनी थेट जयंत पाटील यांना चॅलेंज दिले आहे.

जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पुढं केलेला कार्यकर्ता कुठला आहे, कुठच्या गावाचा आहे, हे मला माहितीही नाही. त्यांना काय भूमिका मांडायची असेल तर त्यांनी स्पष्टपणे समारोसमोर येऊन मांडावी. आम्ही काहीही चुकीचं काम केलेलं नाही अन्‌ चुकीचं काम केलं असेल तर आमच्यावर कारवाई करावी, आम्ही त्या कारवाईला समोरे जाण्यास तयार आहोत, असेही पडळकर यांना म्हटले आहे.

ते म्हणाले, औंध देवस्थान आणि माझा काहीही संबंध नाही. आम्हाला तो विषयही माहिती नाही. तो विषय 2012 मधील आहे. अनेक शेतकरी हे नियमानुसार आहेत. त्या जमिनीची पोकळ नोंद असेल तर कोर्टाप्रमाणे त्याचे काम चालते आणि महसूल मंत्री आणि देवस्थानचे काम ज्यांच्याकडे आहे, ते त्यावर निर्णय देतात. मंत्र्यांनी निर्णय घेतलेला असतो, त्यात गोपीचंद पडळकर यांचा काय संबंध येतो. तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि आता भाजप नेत्यावर आरोप करणं, हा बालिशपणा आहे.

Jayant Patil-Gopichand Padlkar
Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाण देणार पवारांच्या नेत्यांना धक्का; सह्याद्रीच्या निवडणुकीत संयुक्त पॅनेल उभा राहणार

जयंत पाटील यांचं ते कोणीतरी पिल्लू आहे, त्याला ते पुढं करत आहेत. मी जयंत पाटील यांच्याबाबत जी भूमिका मांडतो आहे, त्यांना वाटतंय की गोपीचंद पडळकरला बदनाम केले, डॅमेज केले तर तो थांबेल, अशी त्यांची भूमिका असल्यामुळे ते कोणाला तरी पुढे करत आहेत. पण, त्यांनी कोणाला तरी पुढे करण्याऐवजी रितसर स्वतः करावं, असेही त्यांनी म्हटले आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, आता ते सीनिअर लीडर आहेत, त्यांनी दोनवेळा ही भूमिका सभागृहात मांडली आहे. दुसरं काही सापडत नाही, म्हणून माझ्यावर ते देवस्थान जमिनीच्या अनुषंगाने आरोप करत आहेत. पण, औंध देवस्थानशी आमचा काडीमात्र संबंध नाही. त्या काही असेल तर त्यांनी कोर्टात जावं, आम्ही त्यांना त्या ठिकाणी उत्तर देऊ,

Jayant Patil-Gopichand Padlkar
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेना नेत्याचा मोठा दावा; ‘राजकारण हे आकड्याचं गणित...शिंदे लवकरच पुन्हा सीएम होतील’

देवस्थानच्या जमिनी बळकावल्या असतील तर सरकारने 2018 मध्येच त्या परत घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पण, धर्मादाय आयुक्तांची पीटीआरला नोंद असेल तर त्यांची परवानगी घेऊन त्या रिलिज करता येतात. महाराष्ट्रात अशा अनेक जमिनी आहेत, ज्यांना धर्मादाय आयुक्तांनी परवानगी दिली असेल, तसेच त्यांच्याकडे नोंद नसेल तर इनामपत्रिकेत नोंद नसेल आणि 1950 पूर्वीचे सर्व उतारे काढले आणि त्यात पोकळ नोंद असेल तर राज्य सरकारला तो अधिकार आहे, असेच प्रकरण एकच नाही, तर अशा हजारो प्रकरणांमध्ये त्यांनी परवानग्या दिलेल्या आहेत, असा दावाही पडळकरांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com