Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचा फडणवीसांच्या गृहमंत्रिपदाच्या खुर्चीवर डोळा? म्हणाले, 'मी सिनिअर, फक्त...'

Chandrakant Patil On Home Ministery : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी कधीकाळी स्वकीय असणाऱ्या माजी खासदार संजयकाका पाटील यांना बाहेरचा रस्ता दाखवल्या आहेत.
Chandrakant Patil On Home Ministery
Chandrakant Patil On Home Ministerysarkarnama
Published on
Updated on

Sangli News : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सध्या त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी काँग्रेसचे नेते असणारे आणि अपक्ष खासदार असणाऱ्या विशाल पाटील यांना भाजपची ऑफर देऊन राजकीय खळबळ उडवून दिली आहे. याच्या अद्याप चर्चा थांबलेल्या नाहीत. तोच त्यांनी, थेट आपली इच्छा राज्याचे गृहमंत्री होण्याची असल्याचे बोलून दाखवली आहे. यामुळे ही आता राज्यासह भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी, तासगाव येथील शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. येथे मंडळाने सुमारे 4 कोटी 65 लाख रुपये खर्चून भव्य असे दुर्गामाता मंदिर उभारले आहे. या मंदिरात दुर्गामातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रमावेळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या महाआरतीनंतर ते बोलत होते.

यावेळी चंद्राकांत पाटील यांनी, मी राज्यातील सिनिअर मंत्री असून जवळपास सर्व मंत्रिपदे भूषवली आहेत. पण अद्याप ‘गृहमंत्री’पद मिळालेलं नाही. फक्त ‘गृहमंत्री’पद फक्त राहिले आहे. पाटील यांनी असे विधान केल्याने आता वेगवेगळ्या चर्चांना उत आला आहे. तर पाटील यांचा डोळा फडणवीस यांच्या गृहमंत्रिपदाच्या खुर्चीवर तर नाही ना अशी शंका आता व्यक्त केली जातेय.

Chandrakant Patil On Home Ministery
Chandrakant Patil : माजी खासदार संजयकाकांसाठी भाजपचे दरवाजे बंद! चंद्रकांत पाटलांकडून माजी नाही, आजी खासदारांनाच ऑफर...

दरम्यान त्यांनी खासदार विशाल पाटील यांना पुन्हा एकदा भाजपची ऑफर दिली आहे. विशाल पाटलांनी भाजपत यावे, यासाठी आपण त्यांना सारखी ऑफर देतच राहू असेही त्यांनी म्हटलं आहे. तर त्यांनी कधी काळी भाजपचे असणाऱ्या माजी खासदार संजयकाका यांच्या परतीचे दोर कापले असून त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत राहावे असे सल्ला दिला आहे.

संजयकाका पाटील यांनी लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवली होती. पण त्यांचा लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही पराभव झाला होता. निवडणुकीच्या तोंडावर संजयकाकांनी हाती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले होते. पण अद्यापही त्यांची वेळ चांगली आलेली नाही. यामुळेच ते आता पुन्हा एकदा भाजपमध्ये जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

Chandrakant Patil On Home Ministery
Chandrakant Patil Statement : शिंदेंची दादांविरोधात शहांकडे तक्रार? चंद्रकांत पाटील म्हणतात, खळखळ व्यक्त केली नाही तर...

पण आता चंद्रकांत पाटील यांनी संजयकाका पाटील सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. त्यांच्या पुनर्वसनाबद्दल अजितदादांना साकडे घालू असे म्हणतं त्यांच्या प्रवेशाला पूर्ण विराम दिला आहे. तर ते जुने नेते, जुने मित्र असून त्यांच्या पुनर्वसनासाठी मदत करू असेही पाटील यांनी म्हटलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com