'सिल्व्हर ओक'वरील हल्ल्यानंतर यंत्रणांना खडबडून जाग; गृहविभागाचे तीन मोठे निर्णय

Silver oak attack| Sharad Pawar| Supriya sule | ८ एप्रिलला एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर हल्ला केला होता
sharad pawar security
sharad pawar security

सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक वरील हल्ल्यानंतर राज्याच्या गृहविभागाने मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shabhuraj desai) यांनी दिली. तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासुद्धा सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासोबत आता पोलिसांचे एक वाहन आणि दोन अधिकारी तैनात असतील.

८ एप्रिलला एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर हल्ला केला. घरावर दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आली. यावेळी त्यांच्या घराबाहेर फक्त दोन पोलिस तैनात होते. या घटनेचे गांभीर्य पाहता पवार कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आंदोलक अंगणात आल्यानंतर सुप्रिया सुळे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पुढे आल्यास, पण त्यांनाही आक्रमक कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केली. पवारांच्या कुटुंबियांना धोका निर्माण होईल अशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती. यामुळे शरद पवार यांच्यासह कुटुंबियांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

sharad pawar security
धक्कादायक : पोलीस ठाण्यातच महिला पोलीस असुरक्षित ; हवालदारानेच केला विनयभंग

सध्या शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे. पण घरावर जेव्हा हल्ला झाला त्यावेळी केवळ दोन पोलीस त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यामुळे पोलीस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव शरद पवार यांचा सातारा दौराही रद्द करण्यात आला. पण सुरक्षेच्या कारणास्तव नव्हे तर अन्य कारणांमुळे दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती शरद पवार यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवास्थानी झालेल्या हल्ला प्रकरणी पोलीसांवरही कारवाई करण्यात आली आहे. सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas nagare patil) यांनी परिमंडळ 2 चे डीसीपी योगेश कुमार यांना पदावरुन हटवले आहे. त्यांची दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या चुकीमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

योगेश कुमार यांच्या जागी आता आयपीएस निलोत्पल यांची त्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, हल्ला प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच, डीसीपी योगेश कुमार यांच्यावरील कारवाईनंतर गावदेवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामप्यारे राजभर यांनाही हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com