Chandrakant Patil : भाजप किती जागा लढवणार? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, "288 जागांवर..."

Chandrakant Patil On Assembly seat sharing : "अजितदादा नाराज आहेत असा संभ्रम निर्माण करण्याचं काम विरोधी पक्षाचे आहे. अजित पवार यांच्या पक्षासह आम्ही गुण्यागोविंदाने राहतो. अजित पवार यांना महायुतीत एकटं पाडलं जातं हे खरं नाही."
Narendra Modi-Amit Shah-Devendra Fadnavis-Chandrakant Patil
Narendra Modi-Amit Shah-Devendra Fadnavis-Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 28 July : कोल्हापुरात भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत भाजपची विभागवार बैठक पार पडली. बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी भाजपची 288 जागांवर लढण्याची तयारी असल्याचं सांगितलं आहे.

राज्यभरात भाजप विभागवार बैठक घेण्याचं पुण्यातील अधिवेशनात ठरलं आहे. त्यानुसार आज दक्षिण महाराष्ट्राची बैठक झाली. यानंतर पश्चिम महाराष्ट्राची बैठक होणार आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. लोकसभेला थोडं कमी पडलो यावर चर्चा करून पुढे कसं जायचं याची चर्चा आजच्या बैठकीत झाल्याचंही पाटील यांनी सांगितलं.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांतदादांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) अजित पवारांची नाराजीबाबतच्या चर्चांवर भाष्य केलं. ते म्हणाले, "अजितदादा नाराज आहेत असा संभ्रम निर्माण करण्याचं काम विरोधी पक्षाचे आहे. अजित पवार यांच्या पक्षासह आम्ही गुण्यागोविंदाने राहतो. अजित पवार यांना महायुतीत एकटं पाडलं जातं हे खरं नाही. अजितदादा हे विविध कामानिमित्त अमित शाह यांना भेटले असतील, उलट वारंवार भेटल्यामुळे त्यांच्या मनात जे प्रश्न असतील ते सगळे सुटले असतील."

Narendra Modi-Amit Shah-Devendra Fadnavis-Chandrakant Patil
Bacchu Kadu : बच्चूभाऊंनी वाढवलं महायुतीचं टेन्शन, नव्या राजकीय समीकरणासाठी मनोज जरांगेंना आमंत्रण

जरांगेंनी मुद्द्याला धरुन बोलावं

मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) माझी विनंती आहे की, त्यांनी मुद्द्यांना धरून बोललं पाहिजे. वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्यातून तुमच्याबद्दलच नकारात्मक मत तयार होत आहे. त्यामुळे मुद्द्याला धरून जरांगे यांनी बोलावं, अशी विनंती पाटील यांनी यावेळी केली. तर सरसकट आरक्षण हे कोर्टात टिकणार नाही.

Narendra Modi-Amit Shah-Devendra Fadnavis-Chandrakant Patil
Gulabrao Patil: मी राजीनामा द्यायच्या तयारीत: गुलाबराव पाटील संतापले...

कायद्याने झालेल्या प्रत्येक आरक्षणाला सर्व्हे हा करावाच लागतो. ते काम मागासवर्ग आयोगाचे आहे. आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेला वर्ग मोठा आहे. 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार. पण हा मुद्दा कोर्टात महाविकास आघाडीला मांडता आलं नाही ते आम्ही कोर्टात मांडलं, त्यानुसार 10 टक्के आरक्षण देण्यात आल्याचंही पाटील यांनी सांगितलं.

भाजपची 288 जागांवर लढण्याची तयारी

चंद्रकांतदादा यांनी यावेळी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं. भाजपची 288 जागांवर लढण्याची तयारी आहे. पण महायुतीत लढण्याचा आमचा ठाम निर्णय असून महायुतीत जेवढ्या जागा मिळतील त्या लढवू, पण तयारी 288 जागांची असून उरलेल्या जागांची तयारी मित्र पक्षांसाठी वापरू, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com