Jaykumar Gore : ...तेव्हा बारामतीकरांच्या छातीत सर्वांत पहिल्यांदा कळ आली; पण, मी बारामतीच्या पुढं कधी झुकलो नाही अन्‌ झुकणारही नाही : जयकुमार गोरेंचा इशारा

Maan Khatav Politic's : साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं त्यांचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात अस्तित्वच ठेवलं नाही. आता सोलापूर, सांगली नव्हे; तर जळीस्थळी काष्टी पाषाणी त्यांना गोरेच दिसतो आहे. पण, जोपर्यंत जनता माझ्यासोबत आहे, तोपर्यंत माझं कोणी वाकडं करु शकत नाही.
Jaykumar Gore
Jaykumar Gore Sarkarnama
Published on
Updated on

Dahiwadi, 30 March : अनेक नेते आले, गेले पण माण खटावच्या मातीचं दु:ख कधी संपलं नाही. पण, आता माण-खटावच्या मातीचं दु:ख संपतय, हे बघितल्यावर बारामतीकरांच्या छातीत सर्वात पहिल्यांदा कळ आली. मी बारामतीकरांच्या पुढं कधी झुकलो नाही अन्‌ झुकणारही नाही, अशा शब्दांत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना इशारा दिला.

विरोधकांच्या षडयंत्रांकडे मी यापूर्वी जास्त मनावर न घेता दुर्लक्ष करायचो. पण आता कार्यक्रम केल्याशिवाय सुटीच नाही, असा निर्णय मी आता घेतला आहे, असेही गोरे यांनी विरोधकांना सुनावले. माण तालुक्यातील आंधळी येथील सत्कार समारंभात जयकुमार गोरे (Jaykumar Gore) बोलत होते.

मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, मी बारामतीच्या (Baramati) पुढं झुकलो असतो, तर माझी आमदारकी सोपी झाली असती. पण, पाण्यापासून माझी जनता वंचित राहिली असती. बारामतीकरांना माझा विरोध नाही, तर माझा विरोध त्यांना आहे, ज्यांनी माझ्या मातीला पाण्यापासून, विकासापासून वंचित ठेवलं.

साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं त्यांचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात अस्तित्वच ठेवलं नाही. आता सोलापूर, सांगली नव्हे; तर जळीस्थळी काष्टी पाषाणी त्यांना गोरेच दिसतो आहे. पण, जोपर्यंत जनता माझ्यासोबत आहे, तोपर्यंत माझं कोणी वाकडं करु शकत नाही, असा इशाराही गोरे यांनी दिला आहे.

Jaykumar Gore
Karmala Politic's : करमाळ्याच्या राजकारणातील मोठी घडामोड; आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीतून बागल गटाची माघार

जयकुमार गोरे म्हणाले, आतापर्यंतच्या सर्वच निवडणुकीत माझ्या पाचवीला संघर्ष पुजला आहे. ज्यांच्याकडे संघर्षातून वाट काढायची क्षमता असते, तो पुढे जातो. ती क्षमता घेऊन मी जन्माला आलेलो आहे. हा संघर्ष मी माझ्या मातीच्या सन्मानासाठी केला आहे. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर अस्थिविसर्जनसुद्धा माझ्या विरोधकांनी करू दिलं नाही, लगेच षडयंत्र सुरू झाली. मी आमदार, मंत्री होऊ नये, यासाठी नदीकाठी पूजा करण्यात आल्या. मंत्री झाल्यावरही काहींनी पूजा केल्या. आपल्या मातीतीला मंत्री झाल्यावर आनंद होतो, पण माझ्याबाबत तसं झालं नाही. पण जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे.

ग्रामविकास मंत्रीपद जयकुमार गोरे यांना मिळाल्यावर बारामतीकरांचा जळफळाट झाला. त्यातूनच त्यांच्यावर बालंट आणण्याचा प्रयत्न केला गेला. पण, गोरे यांनी असा काही डाव टाकला की सर्व विरोधक धोबीपछाड झाले. आम्ही जयकुमार गोरेंच्या पाठीशी छातीचा कोट करुन उभे राहू, असा शब्द डाॅ. दिलीपराव येळगावकर यांनी जाहीर कार्यक्रमातून दिला.

Jaykumar Gore
Loan waiver : शिवसेना नेत्याने सांगितली कर्जमाफी मिळविण्याची अफलातून आयडिया; शिंदे मनावर घेणार का? (Video)

या वेळी सोनिया गोरे, माजी आमदार डाॅ. दिलीपराव येळगावकर, डी. एस. काळे, अर्जुन काळे, अरुण गोरे, शिवाजीराव शिंदे, गणेश सत्रे, संजय गांधी, किसन सस्ते, बलवंत पाटील, बाळासाहेब कदम, सिध्दार्थ गुंडगे, हरिभाऊ जगदाळे, विशाल बागल, मिनाक्षी काळे, मनीषा काळे, गुलाब उगलमोगले, सोमनाथ भोसले, प्रा. राजेंद्र जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com