Loan waiver : शिवसेना नेत्याने सांगितली कर्जमाफी मिळविण्याची अफलातून आयडिया; शिंदे मनावर घेणार का? (Video)

Mahayuti Government : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवडणुकीपूर्वीची भाषा वेगळी होती. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यापासून कर्जमाफी करणारच असे ते सांगत होते. आता अजित पवारांनी हात वर केले आहेत. खरं म्हणजे अजितदादांनी राजीनामा दिला पाहिजे.
Devendra Fadnavis-Eknath Shinde-Ajit Pawar
Devendra Fadnavis-Eknath Shinde-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 30 March : शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी कर्जमाफीची जबाबदारी एकनाथ शिंदे यांची आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यासमोर उपोषणाला बसावं, असा सल्ला दिला आहे. आता शिवसेनेकडून काय उत्तर येते, हे पाहावे लागणार आहे.

संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (EKnath shinde) यांची निवडणुकीपूर्वीची भाषा वेगळी होती. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यापासून कर्जमाफी करणारच असे ते सांगत होते. आता अजित पवारांनी हात वर केले आहेत. खरं म्हणजे अजितदादांनी राजीनामा दिला पाहिजे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नसतील तर राज्यातील जनतेचा वचनभंग केल्याबद्दल अजित पवारांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे.

दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान मी ऐकलं. जेव्हा अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या युतीच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना २१०० रुपये देण्याची घोषणा केली. त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणे आणि कर्जमाफीचा निर्णय घेण्याची जबाबदारी शिंदे यांची आहे. ते मुख्यमंत्री असताना कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजनेबाबत वचन दिले, त्यामुळे त्यांची जबाबदारी जास्त आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

Devendra Fadnavis-Eknath Shinde-Ajit Pawar
Karmala Politic's : करमाळ्याच्या राजकारणातील मोठी घडामोड; आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीतून बागल गटाची माघार

संजय राऊत म्हणाले, आजच त्यांचं एक विधान मी ऐकलंय की काहीही झालं तरी आम्ही आमचं वचन पूर्ण करणारच, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तुम्ही ते कसं करणार. तुमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाही म्हणून सांगत आहेत. पण, जोपर्यंत लाडक्या बहिणींना २१०० रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही, तोपर्यंंत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या लोकांसह अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्याबाहेर उपोषणाला बसावं. ते जनतेचे नेते आहेत ना. लाडक्या बहिणींचे भाऊ, शेतकऱ्यांचे पुत्र म्हणून ते स्वतःला घेतात ना?

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी कर्जमाफीचे वचन दिलेले आहे, त्यामुळे त्यांना दाखवावं लागेल की मी वचनाला किती पक्का आहे. प्राण जाए पण वचन न जाए ही शिवसैनिकाची आणि मराठी मावळ्याची भूमिका असते. एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यासमोर लाडक्या बहिणींची फसवणूक चालली आहे, शेतकऱ्यांना गंडवलं जात आहे. सरकारमध्ये बसून तुम्ही काय करत आहात?, असा सवाल राऊत यांनी केला.

Devendra Fadnavis-Eknath Shinde-Ajit Pawar
Prashant Paricharak : प्रशांत परिचारकांच्या निष्ठेची फडणवीसांनी केली कदर; दुःखाच्या प्रसंगात दिला मोठा आधार!

कर्जमाफीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दारासमोर उपोषणाला बसा. आंदोलन हा शिवसैनिकांचा आत्मा आहे, तुम्ही जर खरे शिवसैनिक असाल, तुमच्याकडे जरी नकली शिवसेना असली तरी तुम्ही स्वतःला शिवसैनिक मानता ना? मग देवगिरी बंगल्याच्या बाहेर आंदोलन करा, असा सल्ला संजय राऊतांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com