Prithviraj Chavan : पृथ्वीराजबाबांवर मी एकतर्फी प्रेम केलं : भाजप मंत्र्यांची जाहीर कबुली

Jaykumar Gore Statement : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी असलेले ऋणानुबंध कायम राहतील, असे मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. मात्र, त्यांच्यावर केलेले प्रेम एकतर्फी होते, याची कबुलीही त्यांनी दिली असून यापूर्वीही हे स्पष्ट केल्याचे सांगितले.
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Karad, 13 October : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आणि माझे ऋणानुबंध चांगले आहेत. त्यात कोणताही बदल होणार नाही. मात्र, त्यांच्यावर मीच प्रेम केले. ते एकतर्फी होते, असे मी कित्येकदा स्पष्ट केले आहे, अशी कबुली राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी कऱ्हाड येथे सभा झाली. त्या सभेनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या जुन्या पक्षातील आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला.

भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यापूर्वी जयकुमार गोरे हे काँग्रेस पक्षात होते. काँग्रेसमध्ये असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गोरे यांना आशीर्वाद होता. चव्हाण यांचे कट्टर समर्थक अशीच गोरे आणि माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची ओळख होती. मात्र, १ सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

गोरे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. कराडमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत भाष्य केले.

Prithviraj Chavan
Satara Politic's : जयकुमार गोरेंनी शंभूराज देसाई अन्‌ मकरंदआबांना पुन्हा डिवचले : ‘परिस्थिती कशीही असो, सातारा जिल्हा बँकेचा अध्यक्ष भाजपचाच होईल...’

ते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत माझे आजही चांगले संबंध आहेत. ते कायम राहतील. पण माझे पृथ्वीराजबाबांवर एकतर्फी प्रेम होते. मीच त्यांच्या प्रेम केले. त्यांच्या जवळ जे होते. त्यांना पृथ्वीराज चव्हाण यांना बऱ्याच गोष्टी दिल्या. पण ते लोक त्यांना सोडून गेले. तरीही आम्ही त्यांच्यासोबत राहिलो होतो. मात्र, तरीही त्यांनी निधी देताना दाखवलेला आखडता हात अधिकच दुःखदायक होता.

Prithviraj Chavan
Purushottam Jagtap : ‘सोमेश्वर’मधील पराभवानंतरही पुरुषोत्तम जगतापांची संघर्षाची भूमिका : ‘एका पराभवाने कुणी संपत नाही अन्‌ आपण तर अजिबात संपलेलो नाही...’

पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात मी कधीही बोललो नाही. मात्र, यावेळी बोलावे लागले. बदल सगळ्यांना समोर दिसतो आहे. तुम्ही काहीही केले तरी चालेल, हे आता चालणार नाही, असा टोलाही जयकुमार गोरे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Praniti shinde-jaykumar gore
Uddhav thackeray, eknath shinde, jaykumar gore
Jaykumar Gore
jaykumar Gore-Devendra Fadnavis
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com