Solapur Sabha : भुजबळसाहेब, सत्तेचा अन्‌ खुर्चीचा गैरवापर करू नका; जरांगे पाटलांनी पुन्हा केले लक्ष्य

Manoj Jarange Patil News : मला डिवचू नका. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणाऱ्यांना आपण सोडत नाही, मग तो कोणीही असो.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on
Updated on

Solapur News : भुजबळसाहेब सत्तेचा आणि खुर्चीचा गैरवापर करू नका. शांततेत चाललेले आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करू नका. कायदा सुव्यवस्था बिघडवू नका. तुम्ही सत्तेच्या खुर्चीवर बसलेले आहात. मराठ्यांचे कार्यक्रम शांतेत होऊ देऊ नका, असे तुम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे का. मी गप्प होतो, पण मला डिवचू नका. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणाऱ्यांना आपण सोडत नाही; मग तो कोणीही असो, अशा शब्दांत मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना लक्ष्य केले. (Manoj Jarange Patil criticizes Chhagan Bhujbal again)

मराठा आरक्षणासंदर्भात जनजागृती करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आज (ता. ५ ऑक्टोबर) सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यांची हुतात्मा स्मृती मंदिरात जाहीर सभा झाली. त्या सभेत बोलताना ‘संभाजीनगरची सभा होऊ देणार नाही,’ असा इशारा देण्यात आल्याचे पत्रकारांकडून सांगण्यात आले. त्यावरून जरांगे यांनी भुजबळांना पुन्हा लक्ष्य केले.

Manoj Jarange Patil
Madha Loksabha : 'मैं जो बोलता हूं, वही मैं करता हूं' ; खासदार रणजितसिंह निंबाळकरांचे सूचक विधान

जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे गेली दोन ते तीन दिवस मी गप्प होतो, मग आज हे काय नवीन पिल्लू.? तुम्ही संविधानिक पदावर बसलेले आहात. राज्य शांततेत राहावे, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, ही तुमची जबाबदारी आहे. ते सोडून तुम्ही आता कार्यकर्त्यांना उद्योग सांगायला लागले का?, सभा होऊ देऊ नका वगैरे. मी आता त्यावर काही बोलणार नाही. वेळ आल्यावर त्यावर नक्की बोलेन.

Manoj Jarange Patil
Loksabha Election : लोकसभा जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीचे मोठे पाऊल; ‘या’ नेत्यांची समिती घेणार निर्णय

तुम्ही मराठा समाजाची मनं दुखवायला लागले आहात. आमच्या समाजाने कधीही तुमचा द्वेष केला नाही. तुम्हाला कायम मान-सन्मान, प्रतिष्ठा देत राहिला आहे. आमच्या समाजाने कधीही तुमच्याकडे या जातीचा, त्या जातीचा म्हणून पाहिलेलं नाही. ओबीसी समाजातील नेत्यांवर आमचा मराठा समाज पिढ्यान् पिढ्या गुलाल टाकत आलेला आहे. आज आमची पोरं अडचणीत आली आहेत, तर तुम्ही म्हणता ओबीसीमध्ये येऊ नका. आरक्षण खालचं घ्या आणि वरचं घ्या, असे सांगता, असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Manoj Jarange Patil
Samarjitsinh VS Mushrif : मुश्रीफ मुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडत नाही, त्यांच्याशी संघर्ष अटळ; समरजितसिंहांचा रोखठोक बाणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com