Ichalkaranji Politics : आवाडे-हळवणकर गटात पुन्हा ठिणगी; 'एक' समिती इचलकरंजीचं राजकारण पेटवणार?

Awade Halvankar conflict : विधानसभा निवडणुकीनंतर इचलकरंजीतील आवाडे आणि हळवणकर गटातील संघर्ष संपणार अशी चिन्हे निर्माण झाली असताना भाजपच्या मंडल अध्यक्ष निवडीवरून अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता. आता त्यानंतर पुन्हा एकदा भाजपअंतर्गत आवाडे आणि हळवणकर गटात चुरस निर्माण झाली आहे.
Suresh Halvankar, Prakash Awade
Suresh Halvankar, Prakash AwadeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 28 May : विधानसभा निवडणुकीनंतर इचलकरंजीतील आवाडे आणि हळवणकर गटातील संघर्ष संपणार अशी चिन्हे निर्माण झाली असताना भाजपच्या मंडल अध्यक्ष निवडीवरून अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता.

आता त्यानंतर पुन्हा एकदा भाजपअंतर्गत आवाडे आणि हळवणकर गटात चुरस निर्माण झाली आहे. संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा या दोन गटात अंतर्गत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मागील वेळच्या समितीच्या अध्यक्ष निवडीवर माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी बाजी मारली होती.

माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी या पदावर चंदुरच्या महेश पाटील यांना संधी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भाजपचे नेते माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर हाळवणकर यांचे कट्टर समर्थक अनिल डाळ्या यांना या समितीच्या अध्यक्षपदावर बसवण्यात आले होते.

Suresh Halvankar, Prakash Awade
Vaishnavi Hagawane : नवऱ्याकडून अश्लील VIDEO दाखवून अत्याचार, घरातच गांजा पार्टी अन् काळी जादू; पुण्यातील आणखी एका विवाहितेचा हुंड्यासाठी छळ

आताची परिस्थिती पाहता इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाची आमदार राहुल आवाडे आहेत. ते देखील भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे आवाडे यांचे समर्थक या पदाचे प्रमुख दावेदार असणार आहेत. त्यामुळे गेल्या वेळी महेश पाटील यांची संधी हुकली होती. आता मात्र त्यांनाच अध्यक्षपदाच्या समितीवर बसवणार की आणखी नवीन चेहरा समोर आणणार हे पहावे लागणार आहे.

सध्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात आणि शहरासाठी भाजपचे पूर्वीचे कार्यालय आहे. मात्र आमदार आवाडे यांनी स्वतंत्र भाजप कार्यालय स्थापन केले आहे. त्यामुळे हाळवणकर आणि आवाडे यांच्यातील छुपा संघर्ष चव्हाट्यावर आला. अशातच मंडल अध्यक्षपदाच्या निवडीवरून आवाडे आणि हळवणकर गट आमने-सामने आला होता.

Suresh Halvankar, Prakash Awade
Anil Gote : अद्याप गुन्हा का नाही? गृहखात्याची प्रतिमा डागाळली, अनिल गोटेंनी पोलिसांवर शंका घेत थेट फडणवीसांना केलं टार्गेट

या दोन्ही गटातील अंतर्गत वादामुळे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील मंडल अध्यक्षाच्या निवडी रखडले आहेत. आता पुन्हा एकदा संजय गांधी निराधार योजनेच्या समितीवरून हे दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. त्यामुळे दोन्ही गटाकडे विशेष लक्ष आहे.

या समितीचे अध्यक्ष पदावरून पुन्हा एकदा दोन्ही गटात वाद निर्माण होणार का? हे देखील पुढच्या काळात स्पष्ट होणार आहे. पण राजकीय परिस्थितीचा अंदाज घेतल्यास त्यावर आवाडे गट बाजी मारण्याची दाट शक्यता आहे. त्यावर हळवणकर गटाची भूमिका नेमकी काय असणार? हे देखील पहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com