Anil Gote : अद्याप गुन्हा का नाही? गृहखात्याची प्रतिमा डागाळली, अनिल गोटेंनी पोलिसांवर शंका घेत थेट फडणवीसांना केलं टार्गेट

Arjun Khotkar aide cash seizure : विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते अर्जुन खोतकर धुळे दौऱ्यावर होते. दौऱ्यात त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या कक्षात एक कोटी ८४ लाख रुपये सापडले. या प्रकरणाला तीन दिवस उलटूनही कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
Devendra Fadnavis, Anil Gote
Devendra Fadnavis, Anil GoteSarkarnama
Published on
Updated on

Dhule News, 28 May : विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते अर्जुन खोतकर धुळे दौऱ्यावर होते. दौऱ्यात त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या कक्षात एक कोटी ८४ लाख रुपये सापडले. या प्रकरणाला तीन दिवस उलटूनही कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

या संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात विधिमंडळाच्या समितीची प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे. त्याहूनही गंभीर म्हणजे गृह खात्याची प्रतिमा डागाळली आहे. गृह खात्याने या प्रकरणात काहीही कारवाई का केली नाही? असा सवाल त्यांनी केला आहे.

गृह खात्यावर विविध आरोप करतानाच त्यांनी धुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर आरोप केले. या निमित्ताने एसआयटीची घोषणा करण्यात आली होती. याबाबत देखील स्पष्ट खुलासा झालेला नसल्याने माजी आमदार गोटे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केलं आहे.

विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक आणि विधिमंडळातील कर्मचारी किशोर पाटील यांच्या खोलीत १.८४ कोटी रुपये सापडले होते. यासंदर्भात माजी आमदार गोटे यांनी या कक्षाबाहेर तळ ठोकला होता. गोटे आणि त्यांच्या समर्थकांनी या खोलीला कुलूप लावल्याने समितीच्या सदस्यांची अडचण झाली.

Devendra Fadnavis, Anil Gote
Vaishnavi Hagwane : वैष्णवीच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा, हगवणे कुटुंबियांचा भांडाफोड होताच वडील अनिल कस्पटेंनी केली मोठी मागणी

यासंदर्भात गोटे यांनी विधिमंडळ समितीचे अध्यक्ष खोतकर आणि स्वीय सहाय्यक पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सहाय्यक पाटील यांना १५ कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. कारवाई झाली त्या दिवशी खोलीत पाच कोटी रुपये असावेत. दिवसभर त्याचे वाटप सुरू होते, आसा पुनरुच्चार गोटे यांनी केला.

या संदर्भात पोलिसांनी नियंत्रणाच्या बैठकीत अनेक अनाहूत लोक उपस्थित होते, असा गंभीर आरोप केला. किशोर पाटील यांची नियुक्ती अधिकृत नसल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. त्यामुळे पोलिसांची गुन्हा दाखल न करताच गेले चार दिवस सुरू असलेली चौकशी याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते.

Devendra Fadnavis, Anil Gote
Vaishnavi Hagawane : नवऱ्याकडून अश्लील VIDEO दाखवून अत्याचार, घरातच गांजा पार्टी अन् काळी जादू; पुण्यातील आणखी एका विवाहितेचा हुंड्यासाठी छळ

पोलिसांना विश्रामगृहाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करण्यात आले आहे. पंचनामा करताना संबंधित रोख रक्कम देखील सापडली आहे. याबाबत किशोर पाटील आणि अन्य संबंधितांचे कॉल रेकॉर्ड तपासल्यास यातील बहुतांशी बाबी स्पष्ट होतील. एवढे गंभीर प्रकरण असताना आणि सबंध विधिमंडळाची प्रतिष्ठा प्रणाला लागली असताना पोलीस याबाबत ठोस कार्यवाही का करत नाही? असा प्रश्न गोटे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com