Pune News, 28 May : पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली. हे प्रकरण अंगलट आल्याचं दिसताच घटनेच्या दिवसापासून वैष्णवीचा सासरा फरार झाला होता.
अशातच आता वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार असताना ज्या थारमध्ये बसून फिरत होते. त्या थार गाडीाचा मालक असलेल्या संकेत नरेश चोंधे याच्याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या चोंधेने देखील आपल्या भावाच्या बायकोचा छळ केल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे.
छळ केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या सुयश चोंधेचा संकेत हा लहान भाऊ आहे. वीस लाख हुंड्यासाठी सुयशच्या पत्नीचा छळ केल्याचा आरोप यांच्यावर असून या जाचाला कंटाळून तिने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तर याच चोंधे फॅमिलीचं आता हगवणे कुटुंबियांशी असलेलं कनेक्शन समोर आलं आहे.
ते म्हणजे राजेंद्र आणि सुशील हगवणे फरार असताना त्यांनी ज्या थारमधून प्रवास केला ती या संकेत चोंधेची आहे. सध्या ही थार गाडी आणि त्याचा भाऊ सुयशची क्रेटा गाडी जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, सुयश चौंधेच्या पत्नीने नवऱ्यासह दीर संकेत चोंधे, सासरा नरेश चौंधे, सासू वैशाली चौंधे यांच्याविरोधात पोलिस आणि महिला आयोगाकडे तक्रार केली होती.
मात्र पोलिसांसह आयोगाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. तर या सुयशच्या पत्नीने चौंधे कुटुंबियांवर अने धक्कादायक आरोप केले आहेत. सासू काळी जादू करते शिवाय लग्नात हुंडा म्हणून दोन लाख रुपये आणि दोन तोळं सोनं दिलं होतं. मात्र, त्यानंतरही वारंवार पैशांची मागणी केली जायची शिवाय यासाठी आपला छळ केला जायचा असं या सुनेने तक्रारीत म्हटलं आहे.
तर संतापजनक बाब म्हणजे तर नवरा सुयश चौंधे हा अश्लील व्हिडीओ दाखवून शरीर संबंध ठेवण्यासाठी त्रास द्यायचा असा गंभीर आरोप करत नवरा आणि दीर सासूसमोरच गांजा प्यायचे, असे आरोप सुनेने सासरच्या लोकांवर केले आहेत. त्यामुळे आता पुण्यातील पुन्हा एक वैष्णवी सारख प्रकरण समोर आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
शिवाय या प्रकरणामुळे आता पुन्हा एकदा पोलिस आणि महिला आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना मदत करणाऱ्या चोंधे बंधूंची बावधन पोलिसांची चौकशी सुरू आहे. तसंच सुयश चोंधे याच्यावर पत्नीच्या तक्रारीवरून मंगळवारी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.