BJP News : इचलकरंजीत भाजपमध्ये नव्याने आलेला आवाडे गट जुन्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात खुपतोय? बंडखोरीचा धोका वाढला

Ichalkaranji BJP Conflict : इचलकरंजी महापालिका निवडणुकीत भाजपमधील नवे विरुद्ध जुने कार्यकर्ते संघर्ष तीव्र झाला असून उमेदवारीवरून नाराजी वाढत आहे, बंडखोरीचा धोका निर्माण झाला आहे.
BJP leaders and party workers amid growing internal tension during Ichalkaranji Municipal Corporation election preparations, reflecting conflict between old loyalists and new entrants.
BJP leaders and party workers amid growing internal tension during Ichalkaranji Municipal Corporation election preparations, reflecting conflict between old loyalists and new entrants.Sarkarnama
Published on
Updated on

Ichalkaranji News : इचलकरंजी महापालिका निवडणूक केवळ पक्षांमधील राजकीय लढत न राहता ती पक्षांतर्गत संघर्ष बनत आहे. सध्या एकतर्फी वाटणारी ही निवडणूक भाजपमधील अंतर्गत अस्वस्थतेमुळे चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. इचलकरंजी महापालिका निवडणुकीमधील 65 जागांसाठी भाजपकडून तब्बल 427 कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. यात नव्याने प्रवेश केलेले तसेच अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ कार्यकर्ते दोन्ही गटांचा समावेश आहे. मात्र, उमेदवारी वाटपाबाबत पक्षांतर्गत सुरू असलेला नवे विरुद्ध जुने संघर्ष वरिष्ठांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

पूर्वी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारा आणि नंतर स्वतंत्र ताराराणी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवणारा आवाडे गट भाजपमध्ये सामील झाला. आवाडे गटाच्या भाजप प्रवेशानंतर शहरातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली. त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व नेतेही भाजपमध्ये दाखल झाले.

यावेळी भाजपमधील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यात अस्वस्थता निर्माण झाल्याचे जाणवत होते. ज्या काळात इचलकरंजी शहरात भाजपकडे उमेदवारांची कमतरता होती, त्या काळातही अनेक कार्यकर्ते निष्ठेने पक्षाचे काम करीत राहिले. आज मात्र उमेदवारीच्या शर्यतीत नव्याने आलेले प्रभावी नेते

BJP leaders and party workers amid growing internal tension during Ichalkaranji Municipal Corporation election preparations, reflecting conflict between old loyalists and new entrants.
Satej Patil : सतेज पाटलांची 'आमदारकीची' वाट बिकट : नगरपालिका निकालाने बदलली समीकरण : आता कोल्हापूर अन् इचलकरंजी महापालिकेकडून आशा

मानसिक तणाव इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व पक्षीय राजकारणात इच्छुक उमेदवारांत मोठ्या प्रमाणावर मानसिक तणाव व अस्थिरता निर्माण झाली आहे. उमेदवारीबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत आहे. तर अनेक प्रभागांत इच्छुक उमेदवार अस्वस्थतेत वावरत असल्याचे चित्र आहे. इच्छुकांमधील स्पर्धा तीव्र उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा होण्याआधीच काही इच्छुकांकडून प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात संभ्रमाचे चित्र आहे.

BJP leaders and party workers amid growing internal tension during Ichalkaranji Municipal Corporation election preparations, reflecting conflict between old loyalists and new entrants.
Shivsena Politics : गळती थांबेनाच! ठाकरेंचे पहिल्या फळीतले सर्वच नेते गेले शिंदे सेनेत; आता 'हा' नेता करणार भाजपत प्रवेश

कार्यकर्त्यांत गैरसमज, नाराजी आणि अंतर्गत मतभेद उफाळून येत आहे. तर अनेक प्रभागांत इच्छुकांमधील स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. परिणामी भाजपमध्ये (BJP) नवे विरुद्ध जुने असा स्पष्ट संघर्ष उभा राहताना दिसत आहे. या पक्षांतर्गत संघर्षाचा परिणाम उमेदवारी पुरता मर्यादित न राहता निवडणुकीच्या प्रचारावर होण्याची शक्यता आहे.

उमेदवारी न मिळाल्यास नाराजी, बंडखोरी वाढण्याचा धोका पक्षासमोर उभा आहे. त्यामुळे उमेदवार निवडताना निष्ठा, कार्यक्षमता आणि जिंकण्याची क्षमता यांचा समन्वय ठेवणे भाजपच्या ज्येष्ठ नेतेमंडळींसाठी आव्हान ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर हे नेते या गुंतागुंतीच्या परिस्थितीतून कसा मार्ग काढतात. उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करतात. याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com