फडणवीसांना अटक केल्यास संपूर्ण महाराष्ट्र पेटेल : हर्षवर्धन पाटलांचा गंभीर इशारा

देवेंद्र फडणवीस हे या सरकारला पुरुन उरले आहेत. त्यांना अडकवण्याचे सर्व पर्याय संपल्यानंतर सरकारने त्यांना चुकीच्या पद्धतीने नोटीस पाठवली आहे.
Harshvardhan Patil-Devendra Fadnavis
Harshvardhan Patil-Devendra FadnavisSarkarnama

पंढरपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे अनेक गैरकारभार आणि घोटाळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बाहेर काढले आहेत. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या महाविकास आघाडी सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातूनच त्यांना नोटीस पाठवली आहे. परंतु देवेंद्र फडणवीस हे या सरकारला पुरुन उरले आहेत. त्यांना अडकवण्याचे सर्व पर्याय संपल्यानंतर सरकारने चुकीच्या पद्धतीने नोटीस पाठवली आहे. सरकारने देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र पेटेल, असा गंभीर इशारा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी आज पंढरपुरात पत्रकार परिषदेत दिला. (If Devendra Fadnavis is arrested, Maharashtra will burn : Harshvardhan Patil)

पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील सूरज जाधव याने राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या केली आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी हर्षवर्धन पाटील आज (ता. १३ मार्च) येथे आले होते. यावेळी त्यांनी जाधव कुटुंबाला इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने रोख दोन लाख रुपयांची रोख मदत दिली. त्यावेळी त्यांनी वरील इशारा दिला.

Harshvardhan Patil-Devendra Fadnavis
व्होरा समितीच्या अहवालात कळेल दाऊदशी कोणाचे संबंध : नारायण राणेंचा नवा बॉम्ब

पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. जी माहिती सरकारकडे आली तीच माहिती, त्यांच्याकडे आली आहे. सरकारकडे आलेली माहिती जाहीर करण्याचा त्यांना घटनात्मक अधिकार आहे. त्यानुसारच त्यांनी माहिती समोर आणली आहे, त्यामुळे त्यांना नोटीस देण्याचा प्रश्नच येत नाही. सरकारमधील मंत्र्यांनी केलेल्या घोटाळ्याची माहिती उघड केल्याने महाविकास आघाडी सरकारचे पितळ उघडे पडले आहे. त्यातूनच त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारने सत्तेचा दुरुपयोग करुन फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्यास भाजप ते सहन करणार नाही, सरकारविरोधात महाराष्ट्र पेटून उठेल, असेही पाटील म्हणाले.

Harshvardhan Patil-Devendra Fadnavis
मला साक्षीदार नाहीतर सहआरोपी बनविण्याचा प्रयत्न ; घोटाळे बाहेर काढणारच!

सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे, त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरु करावा; अन्यथा भाजपच्या वतीने राज्यभरात तीव्र आंदोलन केले जाईल. एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या करुन दहा दिवस उलटून गेले तरी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी सरकारमधील एकही मंत्री फिरकला नाही. पालकमंत्र्यांनाही अद्याप त्या कुटुंबाला भेटण्यासाठी वेळ मिळाला नाही. सरकार असंवेदनशील झाले आहे. सरकारच्या धोरणांमुळे अनेक शेतकरी आत्महत्या करु लागले आहेत. सरकार अनेक किती शेतकऱ्यांचे बळी घेणार, असा संतप्त सवालही पाटील यांनी या वेळी उपस्थित केला.

Harshvardhan Patil-Devendra Fadnavis
शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षाच्या भावाला खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी

या वेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के, तालुका अध्यक्ष भास्कर कसगावडे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com