Khandala Political News : धनगर समाजाला आरक्षण मिळाले, तर पहिला फटका बारामतीला : गोपीचंद पडळकर

Dhangar Reservation धनगर आरक्षणाच्या जागर यात्रेनिमित्त खंडाळा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने लोणंद येथे राधेश्याम मंगल कार्यालयात जाहीर सभेत आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते.
Gopichand Padalkar, Sharad Pawar
Gopichand Padalkar, Sharad Pawarsarkarnama

रमेश धायगुडे

Gopichand Padalkar News : धनगर समाजाला आरक्षण मिळाले, तर त्याचा पहिला फटका बारामतीला बसणार आहे. म्हणूनच शरद पवारांनी धनगर आरक्षणाला विरोध केला. धनगर व धनगड असा शब्दछल करत 'खो' घालण्याचे काम केले, असा आरोप धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांच्या धनगर आरक्षणाच्या Dhangar Reservation धनगर जागर यात्रेनिमित्त खंडाळा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने लोणंद येथे राधेश्याम मंगल कार्यालयात काल (ता. १६) आयोजित जाहीर सभेत आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते.

या वेळी ज्येष्ठ नेते आनंदराव शेळके-पाटील, माजी सभापती रमेश धायगुडे-पाटील, युवा नेते अॅड. वैभव धायगुडे-पाटील, ऋषिकेश धायगुडे-पाटील, बापूराव धायगुडे, बाळासाहेब शेळके, ईश्‍वर ठोंबरे, किसन धायगुडे, तात्या शेंडगे आदी प्रमुख उपस्थित होते.

आमदार पडळकर म्हणाले, धनगर समाजात ऊर्जा यावी, त्यांच्यातील भीती दूर व्हावी, यासाठी कशाचीही पर्वा न करता कोणालाही जाऊन भिडतो आहे. तरीही भीती जाणार नसेल तर साहेब, ताई, दादा, आबांचे खूळ डोक्यातून काढा. ही गुलाम बनवणारी यंत्रणा आहे. या पदांना प्रथम मूठमाती द्या, तरच तुम्हाला राजे होता येईल. Maharashtra Political News

Gopichand Padalkar, Sharad Pawar
बघा साताऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात काय घडलं ? | Bacchu Kadu In satara

गट, तट, पक्ष विसरून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात सर्वांनी एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन करून पडळकर म्हणाले, धनगर समाजाला आरक्षण मिळाले, तर त्याचा पहिला फटका बारामतीला बसणार आहे. म्हणूनच शरद पवारांनी धनगर आरक्षणाला विरोध केला. धनगर व धनगड असा शब्दछल करत खो घालण्याचे काम केले. आरेवाडी येथे (ता. २२) होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही या वेळी आमदार पडळकर यांनी केले.

Edited By : Umesh Bambare

Gopichand Padalkar, Sharad Pawar
BJP Election Strategy : बावनकुळेंनी उघड केली निवडणूक स्ट्रॅटेजी; ‘महायुती उमेदवारांच्या विजयाची जबाबदारी भाजपची...’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com